पिंपरी चिंचवड : प्रतिनिधी
पिपंरी -चिंचवड महानगरपालिका कै. यशवंत मेमोरियल हॉस्पिटल मध्ये गेली ०५ ते १५ वर्ष मानधनावर नर्सेस सलग सेवेत काम करत आहेत. त्यांना व पालिकेतील सुमारे ५००० कंत्राटी कर्मचाऱ्यांना बोनस कायद्यानुसार बोनस लागू होत आहे. त्यांना दीपावली पूर्वी बोनस द्यावा, अशी मागणी राष्ट्रीय श्रमिक आघाडीचे अध्यक्ष यशवंतभाऊ भोसले यांनी पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त शेखर सिंह यांच्याकडे केली. यावेळी आयुक्त यांनी बोनस कायद्यानुसार या कर्मचाऱ्यांना बोनस देण्याबाबत विचार केला जाईल, असे सकारात्मक उत्तर दिले.
ही मागणी मान्य झाल्यास पालिकेत कर्तव्य बजावत असलेल्या मानधनावरील व कंत्राटी सुमारे ५५०० कर्मचायांची दीपावली आनंदात जाणार आहे, असेही भोसले यांनी सांगितले व आयुक्त शेखर सिंह हे कर्मचारी व शहरातील नागरिकांचे प्रश्नांबाबत संवेदनशील असल्याचे सांगून त्यांचे आभार देखील पत्रकार परिषदेत भोसले यांनी मांडले.
सदरील सर्व नर्सेस या राष्ट्रीय श्रमिक आघाडी संघटनेचे सभासद असून त्यांना बोनस कायद्यानुसार दीपावली पूर्वी महापालिकेच्या कायम कर्मचाऱ्याप्रमाणे दिल्या जाणाऱ्या
बोनसची रक्कम स्वानुग्रह अनुदान समान काम समान वेतन या कायद्यानुसार देण्यात यावे.