तळेगाव दाभाडे : प्रतिनिधी
मावळ तालुका समृद्ध झाला पाहिजे. तालुक्याची सर्वागीन प्रगती झाली पाहिजे. तसेच मावळ तालुक्याला वैभवशाली रूप देण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत, असे प्रतिपादन सर्व पक्षीय अपक्ष उमेदवार बापूसाहेब भेगडे यांनी आपला जाहीरनामा प्रकाशित केला. यावेळी त्यांनी आपले मत व्यक्त केले.
तळेगाव, लोणावळा, देहूगाव, देहूरोड, वडगाव या शहराचा विकास करणे, रोजगार उपलब्ध करून देणे महिला सुरक्षा योजनावर भर देणे, शेतीपूरक व्यवसाय निर्माण करणे, विद्यार्थ्यांना कौशल्य आधारित शिक्षण देणे, दुर्गम आदिवासी भागातील प्राथमिक आणि माध्यमिक शाळा सक्षम करणे तसेच क्रीडा व सांस्कृतिक तळेगावचा विकास करणे, हरितचळवळीची उभारणी करणे, पर्यटन विकास पाणीपुरवठा व सिंचननाचा प्रश्न सोडविणे. लोकसेवेची खरी परंपरा रुजवणार असल्याचे मत भेगडे यांनी व्यक्त केले.
जेष्ठमंत्री मदन बाफना म्हणाले की, मावळ तालुका दहशत मुक्त झाला पाहिजे. तालुकायचा विकास करताना कोणाचेही मार्ग दर्शन घेतले नाही. विकासाचा भुलथापा देण्यात आल्या. कार्यकत्याना बाजूला टाकले गेले. मावळ तालुक्यात परिवर्तन झाले पाहिजे.
यावेळी गणेश भेगडे, रवींद्र दाभाडे, संजय भेगडे, दत्ता पडवळ, बबन भेगडे, रुपेश म्हाळसकर, रामदास काकडे, शेखर भोसले, गिरीश खेर आदी उपस्थित होते.