तळेगाव दाभाडे : प्रतिनिधी
तळेगाव दाभाडे येथे स्वतंत्र भारताचे पहिले ओलं पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त तळेगाव दाभाडे नगरपरिषद कार्यालयामध्ये त्यांच्या प्रतिमेस लेखा अधिकारी कैलास कसाब आणि सेवानिवृत्त मुख्याध्यापक तळेगाव दाभाडे पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष गोपाळे गुरूजी या दोघांच्या शुभ हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी संगणक अभियंता सोनाली सासवडे, स्वच्छता निरीक्षक तुकाराम मोरमारे, आस्थापना वरिष्ठ लिपीक भास्कर वाघमारे, श्रीमती शीतल कडूसकर, विभा वाणी, बाळासाहेब पवळे, कर संकलन अधिकारी प्रविण शिंदे, राजेश भुजबळ, अनिता मिलिंद कांबळे, गीतांजली होनमणे, कोमल मोकाशी, तृप्ती नाईक, हिरा पाटील, सुरक्षारक्षक विठ्ठल यादव, कर संकलन लिपीक मयुर ढिलोड, प्रफुल गलियत, आरोग्य विभागाच्या कर्मचारी सुजाता घोडेकर इ.सर्व अधिकारी व कर्मचारी मोठ्या प्रमाणात हजर होते. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन भास्कर वाघमारे यांनी केले.