तळेगाव दाभाडे : प्रतिनिधी
येथील श्री डोळसनाथ नागरी पतसंस्था आयोजित श्री ग्रामदैवत डोळसनाथ महाराज मंदिर येथे त्रिपुरारीपौर्णिमे निमित्त आकर्षित विदयुत रोषणाई करण्यात आली होती. त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त सुमारे पाच हजार दिवे लावण्यात आले होते. दिव्याचा प्रकाशाने संपूर्ण मंदिर परिसर उजळून निघाला होता.
याप्रसंगी मंदिरात आकर्षक रांगोळ्या भाविकांचे लक्ष वेधून घेत होत्या. हजारो भाविकांनी या दीपोत्सवाला भेट दिली. या कार्यक्रमच्या नियोजना संस्थेचे आजी माजी अध्यक्ष संचालक मंडळ व्यवस्थापक सहभागी झाले होते.
About The Author

