पिंपरी चिंचवड : प्रतिनिधी
महाराष्ट्रामध्ये वीस लाख पेक्षा अधिक रिक्षा चालक-मालक असून रिक्षा चालक मालकांसाठी कल्याणकारी महामंडळ स्थापन करण्याची घोषणा महाराष्ट्र सरकारने अनेक वेळा घोषणा केली परंतु अंमलबजावणी मात्र झाले नाही नुसती घोषणा करून सरकार मात्र रिक्षा चालक-मालकांना फसवत आहे.
रिक्षा चालक-मालकांसाठी कल्याणकारी महामंडळ स्थापन व्हावं हि मागणी आता लावून धरणार असून कल्याणकारी महामंडळ, मुक्त रिक्षा परवाना, घरकुल योजना यासह इतर मागण्या मान्य झाल्याशिवाय आता माघार घेणार नाही अशी घोषणा महाराष्ट्र रिक्षा पंचायत तसेच ऑटो टॅक्सी बस ट्रान्सफर फेडरेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष बाबा कांबळे यांनी केली.
महाराष्ट्र रिक्षा पंचायत ऑटो टॅक्सी चालक-मालक संघटना संयुक्त कृती समिती व ऑटो टॅक्सी बस ट्रान्सपोर्ट फेडरेशनच्या वतीने राष्ट्रीय अध्यक्ष बाबा कांबळे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र दौरा सुरू झाला असून, नुकताच सातारा कराड, कोल्हापूर, इचलकरंजी सांगली येथील दौरा संपवून आज दि.5-11-2023 रोजी लोणावळा खोपोली पनवेल नवी मुंबई असा दौरा सुरू केला असून चार दिवस हा दैरा सुरू राहणार आहे , त्यांत ठाणे भिवंडी रायगड मुंबई असा दौरा आहे. या दौऱ्याची सुरुवात लोणावळा येथून करण्यात आली, महाराष्ट्र रिक्षा पंचायत च्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी बाबा कांबळे बोलत होते.
यावेळी ऑटो टॅक्सी बस ट्रान्सपोर्ट फेडरेशनचे राष्ट्रीय उपाध्यक्ष नरेंद्र गायकवाड, महाराष्ट्र रिक्षा पंचायत प्रदेश उपाध्यक्ष बाबुभाई शेख लोणावळा शहर अध्यक्ष आनंद सदावर्ते, प्रदेश संघटक अब्बास खान, शिवसेना वाहतूक विभागाचे महेश केदारी, लोणावळा खंडाळा टॅक्सी संघटनेचे अध्यक्ष अमोल शेडगे, उपाध्यक्ष फिरोज बंगाली, वाहतूक आघाडी पुणे जिल्हा अध्यक्ष पंकज खोले, मनसे वाहतूक आघाडी उपाध्यक्ष संदीप पोटफोडे, टपरी पाथरी हातगाडी पंचायत महिला अध्यक्ष लक्ष्मी सूर्यवंशी, आधी यावेळी उपस्थित होते.
यावेळी बाबा कांबळे म्हणाले रिक्षा चालकांचे प्रश्न अत्यंत गंभीर होत असून रिक्षा चालकांना आत्महत्या करण्याची वेळ येत आहे मुक्त परमिट धोरणामुळे त्यांचा व्यवसाय पूर्ण संपत आला आहे यात टॅक्सी चालकांचे देखील असेच प्रश्न असून ओला उबर या भांडवलदार कंपन्यामुळे तसेच टू व्हीलर सोप्या वाहतुकीमुळे रिक्षा व टॅक्सी या दोन्ही व्यवसाय अडचणी मध्ये आले आहेत आता टॅक्सी आणि रिक्षाने हातात हात घालून काम करण्याची आवश्यकता आहे.
1 डिसेंबरला 2023 रोजी पिंपरी चिंचवड पुणे येथे राष्ट्रीय अधिवेशन आयोजित करण्यात आले आहे हे अधिवेशन यशस्वी करून आपले ताकद दाखवून द्या असे देखील यावेळी बाबा कांबळे म्हणाले.
यावेळी महेश केदारी म्हणाले ऑटो आणि टॅक्सी यांचे प्रश्न सारखे असून आठवणी त्याची संयुक्तरित्या आपण बैठक घेऊन आपले प्रश्न समस्या सोडण्यासाठी एकत्र येऊ.
बाबुभाई शेख म्हणाले, लोणावळा शहरांमध्ये रिक्षा चालकांच्या असंख्य प्रश्न असून रिक्षा स्टँडचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे आदित्य रिक्षा स्टॅन्ड मिळावे यासाठी आम्ही पाठपुरा करत आहोत परंतु त्या साधून मंजुरी मिळाली नाही तसेच इतरही अनेक प्रश्न आहे ते सोडवले गेले पाहिजे.
कार्यक्रमाच्या संयोजनासाठी, विनय बच्चे, भगवान घनवट, विकास खेंगरे, रवींद्र ताकधोंदे, चंद्रकांत बालगुडे, वसीम खान सत्तार शेख, संजय डेंगळे, प्रकाश मातेरे ,दत्ता दळवी राजेंद्र जाधव, सूर्यकांत धकोल, मंगेश खराडे प्रकाश लोखंडे, दिनेश गवळी, चंद्रशेखर उमटे, विजय ठाकर, यांनी कार्यक्रमाच्या संयोजनासाठी परिश्रम घेतले.
कार्यक्रमाचे प्रस्ताविक लोणावळा शहर अध्यक्ष आनंद सदावर्ते यांनी केले आभार अभ्यास खान यांनी मानले.