पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवड जगद्गुरु संत तुकाराम यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यातील श्री क्षेत्र टाळगाव चिखली घरकुलमधील राजगृह सोसायटी बिल्डिंग नंबर १४ मध्ये जगदंबा युवा प्रतिष्ठानच्या वतीने यंदाचा सार्वजनिक गणेशोत्सव प्रचंड उत्साहात व खेळीमेळीच्या वातावरणात साजरा करण्यात आला. गणेशोत्सवाच्या पहिल्या दिवसांपासून ते शेवटच्या दिवसांपर्यंत प्रतिष्ठानच्या वतीने विविध उपक्रम राबविण्यात आले, महिलांसाठी व मुलांसाठी अनेक स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. विविध मान्यवरांच्या हस्ते श्री गणेशाची आरती करण्यात आली. सत्यनारायण महापूजा आयोजित कार्यक्रमात प्रतिष्ठानतर्फे गणेश भक्तांना महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी महाप्रसादाचा लाभ घेण्यासाठी भाविकांची उपस्थिती लक्षणीय होती. याप्रसंगी परिसरातील प्रमुख व इतर मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते.
सार्वजनिक गणेशोत्सव सुरळीत पार पार करण्यासाठी जगदंबा युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रशांत काटे, कार्याध्यक्ष आकाश भालेकर, उपाध्यक्ष अनिल दराडे, सचिव सचिन पाटील, सहसचिव आदेश कदम, खाजिनदार धनाजी तांबे, सहखजिनदार सिद्धेश साळुंखे, सदस्य ऋषिकेश कडवे, महेश पोखरकर, प्रथमेश भोसले, शुभम धावरे, मुकुंद पोखरकर, अमोल पाटील, गणेश भालेकर, अभिषेक कडवे, रोशन कदम, आदित्य बनाईत, शुभम व्हनमाने, सार्थक क्षीरसागर, अथर्व व्हनमाने, देवांग जाधव, अक्षय बर्गे, सुनील जाधव, विशाल राजगोलकर, विनोद वैद्य, मंगेश चावरे, समीर बर्गे तसेच सोसायटीतील सर्वच जेष्ठ मंडळींनी देखील मार्गदर्शन करून गणेशोत्सव कार्यक्रम सुरळीत पार करण्याकरिता परिश्रम घेतले.