मुंबई : महात्मा गांधींचा सत्य व अहिंसा, शांती व सद्भावना हा सुविचार संबंध जगाने स्वीकारला. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय शासकीय कार्यक्रमात गांधी प्रतिमेसमोर पंतप्रधानांनाही नतमस्तक व्हावं लागतं व आरएसएसला खुलेआम गांधी विचारांचा विरोध करता येत नाही म्हणून सदावर्ते सारखे काही एजंट आरएसएसने नेमले, अशी घनघाती टीका राष्ट्रवादीचे मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी सदावर्तींवर केली.
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना नथुराम गोडसे यांचे अखंड हिंदू राष्ट्राची संकल्पना मान्य नव्हती हे सदावरते आरएसएस प्रेमी झाल्यामुळे विसरले आहेत व आता त्यांना बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव घेण्याचाही नैतिक अधिकार राहिलेला नाही असेही तपासे पुढे म्हणाले.
भारतात दलित आदिवासी मुस्लिम अल्पसंख्यांक सवर्ण हे सर्व समाज गुण्यागोविंदाने नांदत असताना राज्यात अशांती पसरण्याचा कॉन्ट्रॅक्ट सदावर त्यांनी घेतला आहे अशी जहरी टीका महेश तपासे यांनी केली.
वकील असून ज्यांना भारतीय राज्यघटना कळत नाही अशा सदावर्तनी वकिलाचा कोट काढून आरएसएसचा खाकी गणवेश परिधान करावा असा टोलाही महेश तपासे यांनी लगावला.