Spread the love

पिंपरी : मागील नऊ वर्षात देशाला फेकू पंतप्रधान मिळाले हे देशातील जनतेचे दुर्दैव आहे. देशातील सार्वजनिक प्रकल्प विक्रीस काढून देशाला देशोधडीला लावण्याचे, तरुणांना बेरोजगार करण्याचे आणि उद्योगपतींना पूरक ठरतील असे निर्णय घेण्याचे काम केले आहे. महिलांसह तरुण बेरोजगारांना अडचणीत आणणारे व महाराष्ट्राला देशोधडीला लावणारे निर्णय भाजपा घेत आहे. आता नागरिक ठीक ठिकाणी भाजपने दिलेल्या फसव्या आश्वासन याबाबत चर्चा करीत असून भाजपच्या हुकूमशाही धोरणामुळे सर्वसामान्य जनता त्रस्त झाली आहे. या दिशाभूल करणाऱ्या बोलघेवढ्या सरकारचा भांडाफोड शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने घरोघरी जाऊन करण्यात येत आहे. शहरातील बेरोजगार युवक आणि सुज्ञ मतदार विविध प्रश्न उपस्थित करून भाजपाला उत्तरं मागत आहे. या मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेऊन मतं मिळवली पण त्यांचे स्मारक करण्याचे आश्वासन दिले होते त्याचे काय झाले. परदेशातून काळे धन परत आणून प्रत्येक नागरिकाच्या बँक खात्यामध्ये पंधरा लाख जमा करणार होते ते मिळाले का. बेरोजगार तरुणांना रोजगार मिळाला का, स्मार्ट सिटीची अवस्था सध्या काय आहे, डिझेल, पेट्रोल चे भाव वाढ गगनाला भिडले असून महागाई वाढली आहे. मेड इन इंडिया, मेक इन इंडिया, स्टार्ट अप इंडिया, डिजिटल इंडिया असे सर्व प्रयोग फसले असून महाराष्ट्रातील प्रकल्प गुजरातला पळून नेण्याचे पाप भाजप सरकार करत आहे अशी टीका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पिंपरी चिंचवड अध्यक्ष ॲड. सचिन भोसले यांनी केली.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्यावतीने “होऊ द्या चर्चा” हे अभियान पिंपरी, चिंचवड, भोसरी विधानसभा मतदारसंघात राबविण्यात येत आहे. या अभियानाद्वारे शहरातील नागरिकांमध्ये जनजागृती करून केंद्र व राज्य सरकारने घेतलेल्या चुकीच्या निर्णयाचा भांडाफोड करण्यात येत आहे. पिंपरी विधानसभा मतदारसंघात जनजागृती करणारे ‘बास झाली तुमची मन की बात, आता ऐका तुम्ही जन की बात’ हे भाजपाचा खोटारडेपणा उघडकीस आणणारे 70000 पत्रके वाटून जनजागृती केली जात आहे.
रविवारी शाहूनगर, पूर्णा नगर येथे या अभियान अंतर्गत नागरिकांशी संवाद साधण्यात आला. यावेळी माजी शहर प्रमुख योगेश बाबर, उपजिल्हाप्रमुख रोमी संधू, उपशहर प्रमुख पांडुरंग पाटील, विधानसभा प्रमुख तुषार नवले, पिंपरी चिंचवड पिंपरी विधानसभा महिला संघटिका वैशाली कुलथे, शहर संघटक राजू जाधव, उपशहर प्रमुख अनिल सोमवंशी, श्रीकांत करोली, विभाग प्रमुख विठ्ठल कळसे, प्रदीप साळुंखे, उपशहर प्रमुख श्रीकांत करोली तसेच कामिनी मिश्रा, राजाराम कुदळे, गुलाब गरुड, शैलेश मोरे, संजय दुर्गुळे, अनिल तारू, संजय पाटील तसेच शाहूनगर पूर्णा नगर परिसरातील शिवसेनेचे प्रमुख पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.
माजी शहर प्रमुख योगेश बाबर म्हणाले की, सध्याचे पंतप्रधान हे देशाचे पंतप्रधान नसून गुजरातचे पंतप्रधान आहेत. असे बहुरूपी पंतप्रधान यापूर्वी देशाला कधी मिळाले नव्हते. हे पंतप्रधान प्रसिद्धी लोलुप असून त्यांची ध्येय धोरणे हुकुमशाही कडे वाटचाल करणारी आहेत.
सुरुवातीला शिवसैनिकांनी पथनाट्य सादर करीत युवक व महिलांमध्ये जनजागृती केली.
स्वागत, प्रास्ताविक पांडुरंग पाटील यांनी केले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *