Spread the love

पिंपरी : चिंचवड

कासारवाडी मधील महापालिकेच्या  येथील जलतरण तलावात  पाणी शुद्ध करण्यासाठी क्लोरीन गॅसचा वापर केला जातो हे करत असताना पाण्याचा व क्लोरीन गॅस चा संपर्क आल्याने गॅस  गळती होवून दुर्घटना  घडली, यामध्ये २२ नागरिक जखमी झाले आहेत. यामध्ये नागरीकांसह, जीवरक्षक, सुरक्षा रक्षक यांचा देखील समावेश होता, सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही, या गॅस गळतीमुळे झालेल्या घटनेची चौकशी करून नागरिकांच्या जीवाशी खेळणाऱ्या संबंधीतावर योग्य ती कारवाई करावी. तसेच भविष्यात आशा घटना घडू नयेत यासाठी सर्व जलतरण तलावसंर्दभातील ठेकेदार, सुरक्षा एजन्सी यांना सुरक्षा ऑडीट बंधनकारक करावे खबरदारीचा उपाय म्हणून संपूर्ण शहरातील महापालिकेच्या जलतरण तलाव केंद्राचे ऑडीट करावे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *