Spread the love

चिखली जलशुद्धीकरण केंद्रातील पाणी उपसा पंपाचे लोकार्पन 

पिंपरी । प्रतिनिधी

समाविष्ट गावांच्या विकासाचा मुद्दा हातात घेवून आम्ही विकासकामांना गती देण्याची भूमिका घेतली आहे. नवीन पाणी उपसा पंपामुळे चिखली व परिसरातील पाणी पुरवठा सक्षम होणार आहे. समाविष्ट गावांतील पाणी प्रश्न सोडवण्यास आम्हाला यश मिळाले आहे, असा विश्वास भाजपा आमदार महेश लांडगे यांनी व्यक्त केला.

 

चिखली आणि परिसरातील सुमारे ९० हजार नागरिकांच्या पाणीपुरवठा सक्षम करण्यासाठी महापालिका प्रशासनाच्या माध्यमातून चिखली जलशुद्धीकरण केंद्रातून थेट पाईपद्वारे पाटीलनगर येथील जलकुंभात पाणी पुरवठा करण्यासाठी स्वतंत्र पंप बसवण्यात आला आहे. त्याचे लोकार्पण आमदार लांडगे व समस्थ ग्रामस्थ चिखली यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.

 

यावेळी माजी महापौर राहुल जाधव, माजी नगरसेवक सुरेश म्हेत्रे, कुंदन गायकवाड, सुरेश लोखंडे, दिनेश यादव, विनायक आबा मोरे, अंकुश मळेकर, अमृत सोनवणे, यशवंत साने, पांडाभाऊ साने, निलेश नेवाळे, किसन बावकर, प्रदीप आहेर, पिंपरी-चिंचवड सोसायटी फेडरेशनचे अध्यक्ष संजीवन सांगळे, जितेंद्र यादव, दिनेश लोखंडे, नवीन बग, संदीप शेलार, संतोष जाधव, गणेश भुजबळ, अविनाश मोरे, संदीप नेवाळे, तुकाराम जाधव, सदाशिव नेवाळे, कार्यकारी अभियंता रामनाथ टकले, मिलन दौंदर, अभियंता रमेश जिंतीकर आदी उपस्थित होते.

 

माजी महापौर राहुल जाधव म्हणाले की, समाविष्ट गावे विकासापासून वंचित होते. मात्र, २०१४ मध्ये आमदार महेश लांडगे यांनी निवडून आल्यानंतर समाविष्ट गावांच्या विकास विकासाला चालना मिळाली. २०१७ मध्ये ‘व्हीजन-२०२०’ अंतर्गत समाविष्ट गावांसाठी पाणी पुरवठा सक्षम करण्यासाठी २०१७-१८ मध्ये आंद्रा पाणी प्रकल्पाला गती देण्यात आली. या प्रकल्पातील पाणी चिखलीला मिळणार नाही, अशी दिशाभूल करण्याचा प्रयत्न काहींनी केला. मात्र, या प्रकल्पाच्या ‘जीआर’मध्येच चिखलीसह समाविष्ट गावांना पाणीपुरवठा करण्याबाबत उल्लेख आहे. नवीन पंपाच्या माध्यमातून केवळ चिखली व आजुबाजुच्या वाड्या वस्त्यांना पाणीपुरवठा होणार आहे.

 

चिखली-मोशी-चऱ्होली हाउसिंग सोसायटी फेडरेशनचे अध्यक्ष संजीवन सांगळे म्हणाले की, चिखली येथील जलशुद्धीकरण केंद्रातील नवीन पंपामुळे चिखली आणि सभोवतालच्या परिसराचा पाणीपुरवठा सक्षम होणार आहे. त्यामुळे सोसायटीधारकांना दिलासा मिळाला आहे. गेल्या आठ-दहा वर्षांपासून महापालिका प्रशासनाच्या हद्दीतील विकसक गृहप्रकल्प उभारणारे विकसक महापालिका प्रशासनाला हमीपत्र लिहून देत आहेत. त्यामध्ये आंद्रा, भामा आसखेड प्रकल्पातून पाणी पुरवठा सुरू होईपर्यंत विकसक सोसायटीधारकांना पाणी पुरवठा करतील, असा उल्लेख आहे. त्याची प्रत्यक्षात अंमलबजावणी आमदार महेश लांडगे यांच्या पुढाकाराने झाली. नवीन पंपामुळे चिखली परिसरातील सर्व सोसायटीधारकांना पाणी पुरवठा सुरळीत होणार असून, समाधानाचे वातावरण आहे.

****

प्रतिक्रिया :

आंद्रा, भामा आसखेड प्रकल्पाला मंजुरी देण्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकारात्मक भूमिका घेतली. त्यामुळे झपाट्याने विकसित होणाऱ्या समाविष्ट गावांसह पिंपरी-चिंचवडचा पाणीपुरवठा सुरळीत होण्यास मदत होणार आहे. दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप आणि आम्ही शहराच्या पाणी प्रश्नाबाबत वेळोवेळी विधानसभा सभागृहात शहराची भूमिका मांडली. चिखली जलशुद्धीकरण केंद्रातील नव्याने सुरू केलेल्या पंपाच्या माध्यमातून चिखली आणि परिसरात पाणी पुरवठा सुरळीत होईल. आगामी काळात शहरातील पाणी पुरवठा सक्षमीकरणासाठी आम्ही कटीबद्ध आहोत.

– महेश लांडगे, आमदार, भोसरी विधानसभा, भाजपा, पिंपरी-चिंचवड.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *