उमरगा:- उमरगा तालुक्यातील व्हताळ या गावी दरवर्षी प्रमाणे तुळजाभवानी मातेच्या पायी जाणाऱ्या भक्तांना व ग्रामस्थांना जगदंब प्रतिष्ठान व गावकरी यांच्या सहकार्याने नऊ दिवस अन्नदान केले जाते व नियमित दांडिया तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रम घेतले जातात .दसऱ्याच्या दिवशी अन्नदाते यांचा सत्कार व मान्यवर यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले.
वक्तृत्व स्पर्देत लहान गट सिद्धार्थ ज्ञानेश्वर जाधव व द्वितीय क्र शर्वरी विजय सगर ,मोठा गट प्रथम पार्वती सतीश सूर्यवंशी व द्वितीय श्रद्धा राजेंद्र जगताप यांचा Methods आला. मुली व महिलामध्ये रांगोळी स्पर्धा प्रथम सौ प्राजक्ता जयवंत मोहिते प्रथम, साक्षी पवार द्वितीय, समृद्धी बालाजी पाटील तृतीय क्रमांक आला.गायन स्पर्धा लहान वं मोठा गट एकत्र वैयक्तिक प्रथम समृद्धी बालाजी पाटील,सामूहिक मध्ये प्रथम जानवी सूर्यवंशी, संजीवनी सूर्यवंशी, श्वेता जाधव, क्रांती जाधव, मोहिनी जाधव यांचा गट आला.नृत्य स्पर्धा लहान गट प्रथम विध्यराणी नागनाथ बिराजदार, द्वितीय अनुजा अमर जगताप तृतीय यशश्री ज्ञानेश्वर जाधव हिचा क्र आला. मोठा गट प्रथम वैष्णवी नानाराव जाधव ,द्वितीय प्रणव सगर, सामूहिक नृत्य लहान गट प्रथम वेदिका महेश जाधव,वैशाली शंकर जाधव, यशश्री युवराज जगताप व द्वितीय क्र पूनम ज्ञानेश्वर ममाळे,श्रावणी लखन ममाळे,समृद्धी अंकुश सूर्यवंशी व मोठा गट सामूहिक नृत्य प्रथम लक्ष्मी सूर्यवंशी, राजश्री जाधव, प्रज्ञा सूर्यवंशी, सरस्वती जाधव, क्रांती जाधव, वैष्णवी जाधव, मोहिनी जाधव, श्रुती जगताप, विद्या बिराजदार यांचा आला. संगीत खुर्ची मोठा गट मुली प्रथम पार्वती सतीश सुर्यवंशी,मुलामधून प्रथम समर्थ ज्ञानदेव जाधव, लहान गट मुली प्रथम प्रज्ञा रवी पाटील, मुलामधून प्रथम यश युवराज जगताप यांचा क्रमांक आला.
या स्पर्धेसाठी प्रमुख पाहुणे व परीक्षक म्हणून प्राध्यापक मा.श्री राजेंद्र सगर व प्राध्यापक श्री अमर आंबर सर यांनी परीक्षण केले.दसऱ्याच्या दिवशी बक्षीस वितरण व सर्व अन्नदाते यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमासाठी श्री राजेंद्र लक्ष्मण जगताप,श्री राजाभाऊ कडाजी जगताप, श्री बालाजी मारुती जाधव, श्री विजय श्रीमंत सगर,श्री योगेश दत्तात्रय जाधव,श्री राजाभाऊ जनार्धन पाटील,अमर गणपती जगताप, विठ्ठल शंकर हासुरे, संभाजी राम जाधव, युवराज विठ्ठल जाधव,श्रीकांत आंगद पाटील तसेच मंडळाचे कार्यकर्ते कृष्णा माधव सगर, आकाश मुरलीधर जगताप, विजय कडाजी जगताप,कालिदास माधव वाघमोडे, संजय कडाजीजगताप,संतोष बलभीम सुरवंशी, आप्पा बालाजी सूर्यवंशी, सचिन सूर्यकांत पाटील, श्रीकांत व्यंकट सुरवंशी, अजित गोपाळ जाधव, आकाश राजेंद्र जाधव, बालाजी दिलीप जाधव,सचिन संजय जगताप, लखन दत्तू ममाळे, गौरव बालाजी मोहिते, तुकाराम शिवाजी ममाळे,संतोष मुरलीधर जगताप, दिनकर प्राताप मोहिते, प्रशांत बळी सगर,गोविंद राजेंद्र सगर, विशाल व्यंकट जाधव,निखिल राजेंद्र सगर मंडळाचे सर्व कार्यकर्ते यांनी भरपूर कष्ट घेतले व नऊ दिवस आचारी म्हणून वैजीनाथ राजेंद्र बिराजदर व सुनील विठ्ठल जगताप यांनी कार्य केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रा. श्री विजय श्रीमंत सगर यांनी केले तर आभार प्रदर्शन श्री अर्जुन माधव सगर यांनी केले.