चिंचवड : प्रतिनिधी
जगदंब फाउंडेशन संचलित मराठा सोयरिक संस्थेने आतापर्यंत 80 वधुवर मेळावे घेवून त्यांनी मोफत तीन हजार लग्न जमवले. हे कार्य अतिशय कौतुकास्पद आहे, असे उदगार चिंचवडच्या विद्यमान आमदार अश्विनीताई जगताप यांनी काढले.
या मोफत मराठा वधू वर परिचय मेळावा प्रसंगी मराठा सोयरिक संस्थेचे अध्यक्ष अशोक कुटे, संयोजक सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षक सुरेशराव हगवणे, शिक्षक नेते मनोज मराठे, माजी नगरसेवक सुरेश भोईर, मच्छिंद्र तापकीर, राजेंद्र गावडे, अश्विनीताई चिंचवडे, माजी महापौर अपर्णाताई डोके, नानासाहेब दानवे, सतीश काळे, गोविंद खामकर, वसंत पाटील, तानाजी खापरे, प्रमोद झावरे,मधुकर शिरोळे, ज्येष्ठ नागरिक संघ काळेवाडी, पिंपरी चिंचवड महानगरपालिका शिक्षक पतसंस्थेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
सकल मराठा समाज व मराठा सोयरीक संस्था आयोजित ८० वा मोफत मराठा वधु वर परिचय मेळावा रविवार दि 3 डिसेंबर 2023 रोजी पुणे जिल्ह्यात चिंचवड येथील कै. आनंदीबाई डोके सभागृहात प्रचंड गर्दीमध्ये पार पडला. या मेळाव्यामध्ये एकूण १२०० समाज बांधवानी हजेरी लावली. हॉल पूर्ण भरला होता व अनेक वधू-वर पालक बाहेर तीन तास थांबून मेळाव्यामध्ये परिचय ऐकत होते. या मोफत मेळावा मध्ये एकूण नावनोंदणी ३१० झाली. त्यापैकी २३० मुलांनी व ८० मुलींनी या मेळाव्यात नावनोंदणी केली. विशेष म्हणजे पालकांसमक्ष अनेक वधू-वरांनी आवडलेल्या स्थळाबरोबर लगेच बाहेर समक्ष चर्चा केली. सर्व वधू वरांनी उस्फुर्तपणे स्टेज वर येऊन स्वतःचा परिचय दिला. त्यामुळे या मेळाव्यातून 25 लग्न जमतील असा विश्वास नानासाहेब दानवे व प्रमोद झावरे यांनी व्यक्त केला. 13 डिसेंबर नंतर सर्वांचा मोफत व्हाट्सअप ग्रुप तयार करून मेळाव्यात आलेल्या सर्व वधु वर पालकांना एकमेकांचे फोटो बायोडाटे मोफत ग्रुप वर बघता येणार आहेत. धाराशिव बीड सातारा सांगली कोल्हापूर नाशिक मुंबई ठाणे अहमदनगर इत्यादी वेगवेगळ्या जिल्ह्यांमधून अनेक वधू -वर पालक या मेळाव्यासाठी सकाळपासून उपस्थित होते.
बऱ्याच जणांना मेळाव्यात गर्दीमुळे परिचय देता आला नाही म्हणून अधिक माहितीसाठी 8847724680 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले. हा मेळावा यशस्वी करण्यासाठी मराठा सोयरिक संस्थेचे मुख्य व्यवस्थापक पुजा पवार, संदीप नवसुपे, धनंजय जगताप, रमेश काळे, महादेव चौधरी, एकनाथ काटे, अंजना पठारे, सुरेखाताई नखाते, संपतराव सोनवणे, बाबू आरेकर व इतर अनेक मान्यवरांनी परिश्रम घेतले. तसेच सूत्रसंचालन शिक्षक नेते मनोज मराठे व नानासाहेब दानवे यांनी केले. नाव नोंदणीसाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिका शिक्षक पतसंस्था व जेष्ठ नागरिक संघ काळेवाडी च्या पदाधिकाऱ्यांनी सहकार्य केले.