तळेगाव दाभाडे : प्रतिनिधी
मामासाहेब खांडगे इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये ‘खंडेनवमी’ अतिशय उत्साहात साजरी करण्यात आली. कु.वैष्णवी दाभाडे ह्या विद्यार्थिनीने ‘खंडेनवमी’ चे महत्व विद्यार्थ्यांना सांगितले. नवरात्रीमध्ये देवीच्या प्रत्येक वेगवेगळ्या रूपांची पूजा करण्यात येते. नवमीच्या दिवशी देवीच्या ‘सिध्दीदात्री’ रूपाची पूजा करण्यात आली. नवरात्रीच्या या दिवसांमध्ये अष्टमी आणि नवमीला विशेष महत्व आहे. इ.१ ली च्या विद्यार्थ्यांनी देवीच्या नऊ रुपांवर आधातीत लघुनाटिका सादर केली. यावेळी विद्यार्थीनींनी देवीच्या नऊ रूपांची वेशभूषा धारण करून महिषासुराचा वध कसा करण्यात आला याचे सादरीकरण केले.
विद्यार्थ्यांना आपल्या संस्कृतीमध्ये शस्त्रास्त्र पूजनाचे महत्व काय आहे हे सांगण्यात आले. शाळेत पाटीपूजन,खेळाचे साहित्य, रोबोटिक लॅब, विज्ञान प्रयोगशाळेतील साहित्य, विविध ग्रंथ,पुस्तके, यांचे पूजन करण्यात आले.थोडक्यात ज्या वस्तूने आपली प्रगती होते किंवा जी वस्तू आपल्या प्रगतीचे द्योतक असते अशा वस्तूंचे पूजन करणे आपले परम कर्तव्य आहे ह्याचे संस्कार विद्यार्थ्यांमध्ये रुजविले गेले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पल्लवी गायकवाड यांनी केले.
कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका, शाळा प्रशासन व शिक्षकवृंद यांनी सहकार्य केले.