


रविंद्र आप्पा भेगडे युवा मंच यांचा पुढाकार
तळेगाव दाभाडे : प्रतिनिधी
रविंद्र (आप्पा) भेगडे युवा मंच भारतीय जनता पार्टी, इंदोरी शहर यांच्या वतीने, शारदीय नवरात्रोत्सव निमित्ताने हनुमान मंदिर चौक , इंदोरी शहर येथे होम मिनिस्टर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. भाजप मावळ विधानसभा निवडणूक प्रमुख रविंद्र आप्पा भेगडे आणि त्यांच्या पत्नी डॉ.उज्वला भेगडे यांची प्रमुख उपस्थिती या कार्यक्रमास होती. इंदोरी शहरातील महिलांनी रविंद्र आप्पा भेगडे यांचे जल्लोषपूर्ण स्वागत केले.
मनोरंजक खेळ ,गप्पा आणि उखाणे असे या स्पर्धेचे स्वरूप होते. निवेदक विक्रांत शिंदे यांच्या माध्यमातून या स्पर्धेचे सादरीकरण केले गेले. या स्पर्धेसाठी प्रथम क्रमांक फ्रीज आणि पैठणी , द्वितीय एलएडी टीव्ही आणि पैठणी , तृतीय कुलर आणि पैठणी , चतुर्थ क्रमांक ओव्हन मशीन आणि पैठणी आणि पाचव्या क्रमांकासाठी गॅस शेगडी आणि पैठणी अशी बक्षिसे निर्धारित करण्यात आली होती.
या स्पर्धेत , प्रथम बक्षीस – माधुरी काळे , द्वितीय – मेघना चव्हाण , तृतीय – जया लहाने , चतुर्थ क्रमांक – अक्षीदा शिंदे तर , पाचवा क्रमांक – अश्विनी किरण महाजन या महिलांनी बक्षिसे पटकावली.
याप्रसंगी , भावना व्यक्त करताना रविंद्र आप्पा भेगडे म्हणाले , “कोणत्याही विकासाचा पाया हा माता भगिनी यांचा शाश्वत विकास हेच असतो. राज्य सरकार आणि केंद्र सरकारने महिला सक्षमीकरणाचा एक नवा अध्याय सुरू केला असून , या योजनेंचा फायदा शेवटच्या महिलेपर्यंत पोहचविण्यासाठी मी अतोनात प्रयत्न केला. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा फायदा आजवर हजारो महिलांना मिळवून दिला याचे मनस्वी समाधान आहे. मात्र , काही मंडळी महिलांच्या बद्दल अतिशय प्रतिगामी भूमिका घेत आहे . केवळ साड्या वाटप करून , महिला सक्षमीकरण साध्य होणार नाही तर , महिलांना प्रशिक्षित करून त्यांना योग्य मार्गदर्शन प्रदान केल्याने , खऱ्या अर्थाने महिलांचा विकास साध्य होणार आहे. महिलांसाठी सुरक्षित वातावरण निर्माण करणे , हे देखील तितकेच गरजेचे आहे . आपण सर्वजण भयमुक्त मावळ साठी यंदा परिवर्तन घडवू अशी साद मी तुम्हाला द्यायला आलेलो आहे. ” रविंद्र आप्पा भेगडे यांच्या पत्नी डॉ.उज्वलाताई भेगडे यांची पूर्णवेळ उपस्थिती या कार्यक्रमाला होती. त्यांनी देखील सहभागी महिलांचा उत्साह वाढवत त्यांना शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी , मा.जिल्हा परिषद सदस्य श्री प्रशांत आण्णा ढोरे, मा.आदर्श सरपंच श्री.संदिप भाऊ काशीद, मा.अध्यक्ष श्री.जगन्नाथ भाऊ शेवकर, मा.सरचिटनीस सुनिलभाऊ चव्हाण, मा.सरपंच दामोदरभाऊ शिंदे, मा.सरपंच मधुकरभाऊ ढोरे, मा.काळुरामभाऊ पवार, मा.उपसरपंच श्री. संदिप भाऊ नाटक, ग्रा.सदस्य श्री.रुपेश शिंदे,श्री.विनोद भागवत, इंदोरी शहर भाजपा अध्यक्ष श्री.मनोहर भाऊ पानसरे,युवा मोर्चा अध्यक्ष श्री.राहुल ढोरे, श्री.नितीन दगडे,श्री.मुकेशभाऊ शिंदे,श्री.सुदाम शेवकर, श्री.संतुरभाऊ गायकवाड,मा.सभापती ज्योतीताई शिंदे,मावळ भाजपा महिला मोर्चा अध्यक्षा सौ.सायलीताई बोत्रे, मा.जिल्हा परिषद सदस्या सौ.सविता ताई गावडे, ग्रा. सदस्या सौ.सुरेखाताई शेवकर , सौ.सपनाताई चव्हाण, सौ.नीलिमाताई काशीद,मावळ भाजपा महिला मोर्चा ता.सरचिटणीस सौ.नीलमताई पानसरे, मा.उपसरपंच कविताताई चव्हाण, मावळ भाजपा महिला मोर्चा मा.अध्यक्षा सौ.ज्योतीताई ठाकर, मावळ भाजपा महिला मोर्चा युवती सरचिटणीस सौ.चैत्रालीताई शेवकर, मा.उपसरपंच सौ.मनीषाताई शेवकर, मा.उपसरपंच सौ.संगीताताई राऊत, इंदोरी शहर भाजपा सरचिटणीस सौ.विद्याताई काशीद, इंदोरी शहर भाजपा युवती अध्यक्षा सौ.प्रियांका ताई ढोरे, सौ.सपनाताई भेगडे,सौ. नंदनीताई भेगडे, सौ.पल्लवीताई भेगडे , कु.ऋतुराज काशीद यांच्यासह भारतीय जनता पार्टी इंदोरी शहरातील सर्व प्रमुख पदाधिकारी व रविंद्र आप्पा भेगडे युवा मंच चे कार्यकर्ते आणि इंदोरी शहरातील माता भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.