Spread the love

पिंपरी : प्रतिनिधी

पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली देशभरात “21 जून आंतरराष्ट्रीय योग दिन” साजरा करण्यात येत आहे. २१ जून रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदीजी हे श्रीनगर येथे स्वतः योग शिबीरात उपस्थित राहणार असून, देश-विदेशातील करोडो जनतेस स्वस्थ जीवन जगण्याची प्रेरणा व संदेश देणार आहेत. या कार्यक्रमाच्या निमीत्ताने पिंपरी चिंचवड शहर (जिल्हा) भाजपातर्फे शहरात ठिकठिकाणी आंतरराष्ट्रीय योग दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. शहरातील नागरिकांनी विविध शिबीरांमध्ये सहभागी होऊन आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्याचे आवाहन संघटन मंत्री मकरंद देशपांडे यांनी केले आहे.

 

आंतरराष्ट्रीय योग दिनाचे औचित्य साधून शहरात विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत. यासह, २३ जून डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी बलिदान दिन ते ६ जुलै जन्मदिनानिमीत्त वृक्षारोपण कार्यक्रम घेण्यात येणार आहे. २५ जून आणीबाणी काळा दिवस आणि ३० जून रोजी प्रत्येक बुथ मध्ये “मन की बात” कार्यक्रम आयोजनाबाबत भाजपा मध्यवर्ती कार्यालय, मोरवाडी येथे आज कोअर कमिटीची बैठक पार पडली. यामध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन तसेच, मावळ आणि शिरूर लोकसभा निवडणुकीबाबत चर्चा करून संघटन मंत्री मकरंद देशपांडे, मुख्यालय प्रभारी रविंद्र अनासपुरे यांनी मार्गदर्शन केले.

 

यावेळी, प्रदेश उपाध्यक्ष अमर साबळे, प्रदेश सदस्य्‍ महेश कुलकर्णी, आमदार उमाताई खापरे, प्राधिकरणाचे माजी अध्यक्ष सदाशिव खाडे, सरचिटणीस नामदेव ढाके, विलास मडेगिरी, संजय मंगोडेकर, शितल शिंदे, अजय पाताडे, शैला मोळक, युवा मोर्चा प्रदेश सरचिटणीस अनुप मोरे, ‍चिंचवड विधानसभा निवडणूक प्रमुख काळूराम बारणे, पिंपरी विधानसभा निवडणूक प्रमुख अमित गोरखे, युवा मोर्चा अध्यक्ष तुषार हिंगे, माजी नगरसेवक चंद्रकांत नखाते, मंडल अध्यक्ष निलेश अष्टेकर, संदीप नखाते, प्रसाद कस्पटे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

 

आंतरराष्ट्रीय योग दिनानिमीत्त प्रत्येक मंडल स्थानी सार्वजनिक कार्यक्रम शिक्षण संस्था, अन्य सामाजिक संस्थातर्फे शिबीर घेवून, योग शिबीरात व वृक्षारोपण करिता स्थानिक स्तरावरील समाजातील मान्यवर व्यक्ती, कलाकार, खेळाडू यांना आमंत्रित करण्यात येणार असल्याबाबत बैठकीत चर्चा करण्यात आली.

 

देशाचे यशस्वी पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्रात सलग तिसऱ्यांदा महायुतीचे सरकार स्थापन झाले आहे. ही ऐतिहासिक कामगिरी आणि अभिमानाची बाब आहे. लोकसभा निवडणुकीत एनडीएला पूर्ण बहुमत मिळाले आहे. माननीय पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकार गरीब, वंचित, शोषित, दलित आणि आदिवासींना सदैव मदत केली आहे. पंतप्रधानांनी गरीबांच्या कल्याणासाठी घेतलेल्या निर्णयांबद्दल यावेळी आभार व्यक्त्‍ करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक नामदेव ढाके यांनी केले. संजय मंगोडेकर यांनी आभार मानले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *