चिंचवड : प्रतिनिधी
भाजप – शिवसेना – राष्ट्रवादी – आरपीआय आणि मित्रपक्ष महायुतीचे चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार शंकर जगताप यांनी गावभेट दौऱ्यानिमित्त किवळे गावातील ग्रामस्थ आणि नागरिकांच्या गाठीभेटी घेऊन त्यांचा आशीर्वाद घेतला. यावेळी नागरिकांनी अगत्याने स्वागत करून महाविजयाचा आशीर्वाद दिला. सामाजिक बांधिलकी जपत गावातील एकोपा अबाधित राखणारे गाव अशी आमच्या किवळे गावची ओळख आहे. २५ वर्षांपूर्वी आमचे गाव पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत समाविष्ट झाले. स्व. आमदार लक्ष्मण जगताप यांनी त्यांच्या कार्यकाळात आमच्या गावच्या विकासासाठी प्रामाणिकपणे काम केले. किवळेतील १८ मीटर डीपी रस्त्यांसह अंतर्गत स्त्यांचा प्रश्न शंकरभाऊंनीही पुढाकार घेऊन मार्गी लावला. त्यामुळे गावाचा अशाच पद्धतीने यापुढेही विकास व्हावा, यासाठी आम्ही सर्व ग्रामस्थ एकजुटीने आणि एकदिलाने शंकर जगताप यांच्यासोबत राहू, असे आश्वासन किवळे ग्रामस्थांनी दिले.
या भेटीदरम्यान माजी नगरसेवक बाळासाहेब तरस, माजी नगरसेविका सुमन नेटके, संदीप तरस, उमेश सांडभोर, बाबासाहेब सांडभोर, सचिन सांडभोर, संदीप सांडभोर, राजेश सांडभोर, कैलास कातळे, समीर कातळे, संजय कातळे, मोरेश्वर कातळे, बाळकृष्ण कातळे, सदाशिव कातळे, तुकाराम तरस, अतिश तरस, सुधीर साळुंखे, नवनाथ तरस, भरत तरस, विश्वंभर गायकवाड, नवनाथ लोखंडे, बाळू तरस, अशोक तरस, गौतम गायकवाड, बाळासाहेब धुमाळ, किरण धुमाळ, सुरेश धुमाळ, गणेश धूमाळ, नितीन तरस, बापू तरस, विजय तरस, दिपक तरस, निलेश तरस, गणेश जुनवणे, संदीप काळे, सुदाम तरस, अजय उर्फ बिटू लंगे, अंकुश जाधव, मोहन कदम, अंकुश कुदळे, अलका पांडे, विलास तरस, आयुष तरस, बैलगाडा मालक आदेश तरस, विष्णू तरस, रोहिदास तरस, दिलीप दांगट, राजेंद्र तरस, शुभम दांगट, राजेश दांगट, हुमानत अण्णा बगालर, संजय चव्हाण यांच्या निवासस्थानी भेट देऊन त्यांच्याशी संवाद साधला.
याप्रसंगी अनिल चव्हाण, गोरख तरस, रवींद्र कडू, दत्ता काटकर, मारुती पवार, विशाल तरस, दशरथ साळुंके, ओबीसी सेल अध्यक्ष प्रदीप बिलगे यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
स्व. लक्ष्मणभाऊंच्या माध्यमातून चिंचवड विधानसभा मतदारसंघाचा झाला विकास
“चिंचवड विधानसभा मतदारसंघाचा खऱ्या अर्थाने जो विकास झाला तो स्व. लक्ष्मणभाऊंच्या माध्यमातून झाला. त्यांच्या निधनानंतर निर्माण झालेली पोकळी भरून काढण्याचे काम शंकर जगताप यांनी यशस्वीपणे केले. त्यांनी मागील दोन वर्षात भाजप पक्षवढीसाठी आणि चिंचवडच्या विकासासाठी सातत्याने नियोजनबद्ध पद्धतीने काम केले आहे. त्यांच्या याच कार्यप्रणालीने प्रभावित होऊन किवळे परिसरातील सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब धुमाळ, सुरेश धुमाळ, प्रसाद धुमाळ, गणेश धुमाळ, किरण धुमाळ यांच्यासह असंख्य युवकांनी यावेळी भाजपमध्ये आम्ही हा पक्षप्रवेश करण्याचा निर्णय घेतला. आता पक्षप्रवेश करून न थांबता किवळे गावच्या विकासासाठी शंकरभाऊंनाच आमदार करणार असल्याचे”, त्यांनी पक्षप्रवेशावेळी सांगितले.