

पिंपरी चिंचवड : प्रतिनिधी
पिंपरी चिंचवड येथील प्रभाग क्रमांक 14 काळभोरनगर मधील सर्व नागरिकांना मोफत रविवारी 16 मार्च रोजी महाराष्ट्रसह देशात धुमाकूळ घालत असलेला छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावरील आधारित छावा चित्रपट शंकर शेट्टी उद्यानात दाखवला जाणार असल्याची माहिती, भाजप पिंपरी चिंचवड शहर, वरिष्ठ उपाध्यक्ष व प्रवक्ते तसेच पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे माजी नगरसेवक राजू दुर्गे यांनी दिली.
काळभोरनगर येथील माता भगिनींनी आपापल्या घरातील रविवारी सायंकाळचा स्वयंपाक लवकरात लवकर उरकून चित्रपट पाण्यासाठी सायंकाळी 7 वाजता नक्की उपस्थित रहावे. छत्रपती धर्मवीर संभाजी महाराजांवरील आपले प्रेम, श्रद्धा आणि कृतज्ञता अवश्य व्यक्त करावे असे आवाहन करण्यात आले
आहे.