Spread the love

तळेगाव दाभाडे : प्रतिनिधी

श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळ संचलित लोहगड विसापूर विकास मंच व ग्रामस्थांच्या वतीने किल्ले लोहगड पायथ्याच्या शिवस्मारकावर दरवर्षीप्रमाणे तिथीनुसार शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. मंचाच्या कार्यकर्त्यांनी सुंदर फुलमाळांनी, रांगोळ्यांनी व भगव्या पडद्यांनी शिवस्मारक सजावट केली होती. दीपोत्सवात हजारो दिव्यांच्या लखलखाटात शिवस्मारक उजळून निघाले होते. सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत आवारे साहेब यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून दीपोत्सवाला सुरुवात केली. शिववंदनेने महाराजांना अभिवादन करण्यात आले. शिवघोषणांनी गडपरिसर दुमदुमून गेला होता. याप्रसंगी गोल्डन ग्रुप तळेगाव दाभाडे यांचे वतीने मंचाच्या शिवकार्यात लागणारी उंच शिडी सुपूर्द करण्यात आली.

महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातुन शिवभक्त शिवजयंतीच्या आदल्या दिवशी लोहगडवरून शिवज्योत प्रज्वलित करून आपापल्या गावी घेऊन जाण्यासाठी मोठ्या संख्येने आले होते. सर्व शिवमंडळांनी शिवस्मारकावरून ज्योत प्रज्वलित करून महाराजांचा जयघोष केला. मंचाच्या वतीने आलेल्या शिवभक्तांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. या सर्वांची मंचाच्या वतीने चहापाण्याची व्यवस्था करण्यात आली होती. शिवजयंती उत्सव यशस्वी करण्यासाठी मंचाचे संस्थापक सचिन टेकवडे, अध्यक्ष विश्वास दौंडकर, अनिकेत आंबेकर, सागर कुंभार, संदीप गाडे, महेंद्र बैकर, सचिन निंबाळकर, सागर दळवी, अनिकेत इंगवले, सचिन कुंभार, अथर्व दळवी, अमोल गोरे, बसप्पा भंडारी, अजय मयेकर, चेतन नाटक, बाळकृष्ण बेल्हेकर, निलेश भोसले, दत्ता घोडके, सचिन आमले, लक्ष्मण सावरी, सचिन शिंदे, महेश मोरे, देवेंद्र मोरे, दीपक काची, नितीन ढोबळे, चेतन जोशी, शंकर चिव्हे, पोपट दिघे, आदी कार्यकर्त्यांनी योगदान दिले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *