Spread the love

पुणे : प्रतिनिधी

ओला उबेर सह अनेक भांडवलदार कंपन्या आप बेस टॅक्सी व रिक्षा चालकांवरती अन्याय करत असून अक्षरशा या कंपन्याकडून गोरगरीब कष्टकरी आटो टॅक्सी चालकांची लूट सुरू आहे.

भांडवलदार कंपनीकडून होणारी लूट थांबवण्यासाठी ॲग्रीकेटर कायद्याला मंजुरी द्यावी अशी मागणी आम्ही वेळोवेळी केलेली आहे याबद्दल आम्ही नुकताच पुणे पिंपरीत शहरांमध्ये बंद देखील पाळला.

तसेच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना निवेदन दिले असून लवकरच अग्रीकटर कायदा अमलात येईल असे आश्वासन मिळाल्यामुळे दिवाळी दसरा सणासुदीच्या काळामध्ये बंद न करता कायदेशीर व सदनशिर मार्गाने दिनांक 25, ऑक्टोंबर 2023,रोजी पुणे आरटीओ येथे एकत्र येऊन निदर्शने करून आरटीओला निवेदन देण्यात येणार आहे.

25 -10 -2023 रोजी कॅब टॅक्सी व ऑटो रिक्षा चालक मालकांनी सहभागी व्हावे असे आवाहन ऑटो टॅक्सी बस ट्रान्सपोर्ट फेडरेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष बाबा कांबळे यांनी केले आहे, पुणे श्रीमिक पत्रकार भवन येथे पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते.

या वेळी पुणे रिक्षा फेडरेशनचे अध्यक्ष आनंद तांबे, मनसे चे किशोर चिंतामणी, बाळासाहेब शिंगाडे, जनता गॅरेजचे अध्यक्ष सचिन वैराट, टेम्पो बस संघटनेचे प्रकाश झाडे,महाराष्ट्र रिक्षा पंचायत पुणे शहराध्यक्ष मोहम्मद शेख, कार्याध्यक्ष विलास केमसे पाटील, कुमार शेट्टी, अब्बास शेख, प्रवीण शिखरे, संतोष डंबाळे, संतोष दिवरे आदी उपस्थित होते.

” बाबा कांबळे म्हणाले, पुणे मुंबई चेन्नई बेंगलोर दिल्ली व देशातील विविध ठिकाणी ओला उबेर कंपनीच्या विरोधामध्ये आंदोलन सुरू आहेत परंतु हे आंदोलन वेगवेगळ्या पातळीवरती सुरू असून या सर्व आंदोलनाची ताकत एकत्र करून एकत्रितपणे या कंपनीच्या विरोधामध्ये लढणे आता गरजेचे असून वेगवेगळ्या पद्धतीने लढा देऊन हे प्रश्न सुटणार नाहीत, यासाठी मी दिनांक 1 नोव्हेंबर 2023 पासून महाराष्ट्र व देशव्यापी दौरा करणार असून यानंतर पुणे पिंपरी चिंचवड मध्ये मोठी सभा घेऊन आंदोलनाची भूमिका ठरवली जाईल,असे या वेळी बाबा कांबळे म्हणाले.

आनंद तांबे म्हणले दिवाळीनंतर हे आंदोलन तीव्र करण्यात येणार असून सर्व संघटनांना विश्वासात घेऊन तसेच विश्वासात घेऊन आंदोलनाची तीव्रता वाढण्यात येणार आहे.

सणासुदीच्या काळामध्ये होनाऱ्या बंदला पाठिंबा नाही, मनसेचे किशोर चिंतामणी आणि बाळासाहेब शिंगाडे यांनी सांगितले.

आम्ही रिक्षा चालक मालक यांच्या बाजूने असून रिक्षा चालक मालक यांचीही लढाई आहे या लढाईमध्ये सदस्य मार्गाने कायदेशीर मार्गाने आम्ही पाठिंबा देत आहोत असे सचिन विराट म्हणले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *