कै..शं. वा.परांजपे यांच्या स्मृती दिनानिमित्त केले होते आयोजन
तळेगाव दाभाडे : प्रतिनिधी
प्रतिवर्षी २४ नोव्हेंबर हा दिवस कलापिनी संस्थेच्या संस्थापकांचा स्मृतीदिन म्हणून साजरा केला जातो. हा संकल्प दिनही असतो. या दिवशी अनेक संकल्प केले जातात व ते पूर्णत्वासही नेले जातात. कलापिनीचे संस्थापक कै. डॉ.शं. वा.परांजपे यांच्या स्मृती दिनानिमित्त “आधि केलेची पाहिजे” या अंतर्गत कलापिनीत, कलापिनी निर्मित व सृजन नृत्यालय प्रस्तुत ” भाग्ये देखिला तुका” हे नृत्य नाट्य सादर करण्यात आले.
या वेळी संस्थेचे विश्वस्त डॉ.अनंत परांजपे,श्री.अरविंद परांजपे,कीर्तनकार, नाट्य अभिनेत्री, संगीत विद्यालयातून अनेक कलाकार घडवणाऱ्या अंजली क-हाडकर, संस्थेचे अध्यक्ष विनायक अभ्यंकर, सचिव हेमंत झेंडे, खजिनदार श्रीशैल गद्रे, उपाध्यक्ष अशोक बकरे ,कार्याध्यक्षा अंजली सहस्त्रबुद्धे सदस्य विनायक भालेराव, सदस्य चेतन भाई शहा, विश्वस्त शिरीष जोशी, देहूगांवचे श्री. विठ्ठल काळोखे, तुकाराम काळोखे आणि रसिक प्रेक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते नटराज पूजनाने झाली.त्यानंतर ज्येष्ठ गायिका सौ. संपदा थिटे यांनी आपल्या गोड आवाजात “आम्ही चालवू हा पुढे वारसा” हे गुरू गौरव गीत सादर केले. त्यांना कु. अवनी परांजपे हिने सुंदर साथ दिली. कार्याध्यक्षा अंजली सहस्त्रबुद्धे यांनी सर्वांचे स्वागत केले. अध्यक्ष विनायक अभ्यंकर यांनी प्रास्ताविक केले. त्यांनी कलापिनीत लवकरच सावित्रीबाई फुले विद्यापीठाच्या माध्यमातून संगीत कोर्स चालू करण्याचा विचार असल्याचे सांगितले. असे अनेक नवनवीन संकल्प पूर्णत्वास कसे नेता येतील यासाठी सर्वांनी प्रयत्न करण्याचे त्यांनी आवाहन केले. त्यांच्याच हस्ते अंजली क-हाडकर, श्री अरविंद परांजपे, डॉ.अनंत परांजपे, या मान्यवरांचे सत्कार करण्यात आले.तसेच मंदार थिटे, संपदा थिटे,प्रतिक मेहता व डॉ.मीनल कुलकर्णी या कलाकारांचेही सत्कार करण्यात आले. सत्काराला उत्तर देताना अंजली क-हाडकर यांनी आई-वडिलांनी त्यांच्यावर आणि त्यांच्या भावंडावर कसे उत्तम संस्कार केले आणि जडणघडण कशी होत गेली हे अनेक उदाहरणे देऊन अनेक अनुभव सांगून व याला पालकांचे प्रोत्साहन किती महत्वाचे आहे हे अतिशय सुंदर शब्दात सांगितले. यानंतर अरविंद परांजपे यांनी पैशा पेक्षा कलांनी माणूस किती समृद्ध होतो हे सांगितले. डॉ. अनंत परांजपे यांनी या संस्थेचे बीज रोवल्यापासून ते कै. डॉ.शं. वा.परांजपे नावाने भव्य नाट्य संकुल उभ रहण्यापर्यंतचा, अनेक अडचणीवर मात करून एकेक संकल्पाचा ध्यास घेऊन तो पूर्णत्वास नेण्याचा प्रवास कसा झाला ते सांगितले. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचलन अंजली सहस्त्रबुध्दे यांनी केले.
कार्यक्रमाच्या उत्तरार्धात डॉ. मीनल कुलकर्णी यांनी लेखन दिग्दर्शन व नृत्य रचना केलेले व सौ. संपदा थिटे यांनी संगीत दिग्दर्शन केलेले जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या अभंगावर आधारित “भाग्ये देखिला तुका” हे नृत्य नाट्य सादर झाले. या नृत्य नाट्यात संत तुकाराम महाराजांच्या जीवनावर आधारित असलेला प्रसंग त्याला अनुसरून केलेले निरूपण व दिलेली अभंगाची जोड व त्यावर सादर केलेले नृत्य या मुळे हे नृत्य नाट्य अतिशय सुंदर झाले व रंगत गेले. प्रत्येक प्रसंग पाहताना सर्व रसिक प्रेक्षक, प्रेक्षक न रहाता मनाने वारकरी झाले.या नृत्य नाट्यातील सर्वच कलाकारांचा अभिनय अतिशय छान झाला. सर्वच बाजूंनी उत्तम असे हे नृत्य नाट्य होते. यात डाॅ. विनया केसकर, मिहीर देशपांडे, ऋतिक पाटील, चेतन पंडित, विराज सवाई आणि डॉ.मीनल कुलकर्णी यांच्यासह अनेक कलाकार सहभागी झाले होते.उत्कृष्ट ध्वनी संयोजन व प्रकाश योजना केदार अभ्यंकर, प्रतिक मेहता व त्यांच्या सहकाऱ्यांनी सांभाळली.कार्यक्रम यशस्वी करण्या करता श्री.श्रीपाद बुरसे, श्री.रामचंद्र रानडे, अनघा बुरसे, रूपाली पाटणकर, जान्हवी पावसकर, नीता धोपाटे,भाग्यश्री हरहरे,ज्योती ढमाले,मधुवंती रानडे,रश्मी पांढरे यासह सर्व कार्यकारिणी सदस्य व महिला मंचचे सहका
र्य लाभले.