तळेगाव दाभाडे : प्रतिनिधी
मराठी पत्रकार परिषदेची मुंबईत स्थापना ३ डिसेंबर १९३९ रोजी झाली. मराठी पत्रकार परिषदेचा हा स्थापना दिवस राज्यात गेली दहा वर्षे “पत्रकार आरोग्य दिन” मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम.देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली साजरा केला जातो. त्याच पार्श्वभूमीवर आज लोणावळ्यातील प्रसिद्ध अस्थीरोग तज्ञ डॉ हेमंत आगरवाल यांच्या यश हॉस्पिटल येथे पत्रकार,जेष्ठ नागरिक अश्या ३० जणांची रक्तदाब,हाडांचा ठिसूळपणा अश्या विविध आरोग्य तपासण्या करण्यात आल्या.
यावेळी लोणावळा शहर पत्रकार संघांचे अध्यक्ष ऍड संजय पाटील,जेष्ठ पत्रकार श्रीराम कुमठेकर,विशाल पाडाळे,प्रशांत पुराणिक,रेखा भेगडे,श्रावणी कामत,धनु रोकड़े,गुरुनाथ नेमाने,योगेश चव्हाण,महेश कांबळे, सुनील म्हस्के,रश्मी शिरस्कर आदी पत्रकार उपस्थित होते. पत्रकारांसोबतच यावेळी जेष्ठ नागरिक संघांचे अध्यक्ष पांडुरंग तिखे,उपाध्यक्षा मृदुला पाटील संध्या गव्हले,गोरख चौधरी,सुनील पाणगांवकर,नलिनी पुट्टोल,बाळासाहेब गुंड,मंगला राणे श्रीकांत शिंदे आदी मान्यवर यांची आरोग्य तपासणी करण्यात आली.गेली दहा वर्षे हा उपक्रम मराठी पत्रकार परिषद राबवत आहे गेल्या वर्षी राज्यातून १० हजार पत्रकारांची आरोग्य तपासणी करण्यात आली होती. या दिवशी स्थानिक डॉक्टर्सच्या मदतीने पत्रकारांच्या आरोग्याची तपासणी करून त्यांच्यावर प्राथमिक उपचार केले जातात. गंभीर आजाराचा रूग्ण सापडल्यास त्यास मुंबईस पाठवून त्याच्यावर मोफत उपचार केले जातात.
पत्रकारांचं आयुष्य दगदगीचं असतं.जागरण, अवेळी जेवण, तणाव या सर्वांचा पत्रकारांच्या प्रकृतीवर परिणाम होत असतो. मात्र हे दुखणे अनेकदा अंगावर काढले जाते. विषय हाताबाहेर जातो तेव्हा वेळ निघून गेलेली असते. अशी वेळ कोणत्याच पत्रकारावर येऊ नये यासाठी मराठी पत्रकार परिषदेच्यावतीने दरवर्षी आरोग्य तपासणी केली जाते. त्यासाठीच ही शिबिरं होत असतात . स्थानिक पातळीवर सर्व पत्रकारांनी एकत्र येत शिबिरं यशस्वी करावीत असं आवाहन परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम देशमुख, विश्वस्त किरण नाईक, विश्वस्त शरद पाबळे, अध्यक्ष मिलिंद अष्टीवकर, कार्याध्यक्ष शिवराज काटकर, सरचिटणीस सुरेश नाईकवाडे, कोषाध्यक्ष हाजी मन्सूरभाई शेख, राज्य प्रसिध्दीप्रमूख संदीप कुलकर्णी यांनी केले होते .