Spread the love

पिंपरी : पिंपरी चिंचवड शहराला एक समृद्ध सांस्कृतिक वारसा आहे. शहरातील नागरिकांमध्ये आपल्या वैभवशाली इतिहासाविषयी जागृती व्हावी तसेच त्यांच्या कलागुणांना व्यासपीठ मिळावे, यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिका, पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटी लि. आणि सेवा सारथी फाउंडेशन, पूर्णा नगर, चिंचवड या सेवाभावी संस्थेच्या वतीने भव्य किल्ले बनवा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेचे पारितोषिक वितरण समारंभ रविवार, दि. ३ डिसेंबर रोजी सायंकाळी पंडित दीनदयाळ उपाध्याय क्रिडा संकुल, पूर्णा नगर (शनी मंदिर) येथे पार पडला.

 

दिवाळी सणानिमित्त शहरातील नागरिक घरोघरी किल्ले बनविले जातात. यामध्ये प्रामुख्याने विद्यार्थी आणि युवावर्ग यांचा मोठ्या प्रमाणात सहभाग असतो. भव्य किल्ले बनवा स्पर्धेतून त्यांच्या कलागुणांना वाव देण्यात येतो. यंदा ४३५ पेक्षा जास्त सोसायट्यांनी या स्पर्धेत सहभाग नोंदविला. कार्यक्रमासाठी शुभम खेडकर हे प्रमुख वक्ते होते. महापालिका आयुक्त शेखर सिंह, आशिया खंडातील प्रथम अंध सीए भूषण तोष्णीवाल हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी शंभूव्याख्याते अक्षय चंडेल, स्मार्ट सिटीचे सहमुख्य कार्यकारी अधिकारी किरणराज यादव, माजी सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार, अण्णाभाऊ साठे महामंडळाचे माजी अध्यक्ष अमित गोरखे, माजी महापौर तुषार हिंगे, केशव घोळवे, माजी नगरसेविका योगिता नागरगोजे, अनुराधा गोरखे, सुप्रिया चांदगुडे, उद्योजक गंगाधर मांडगे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे शहर सहकार्यवाह उमेश कुटे, देहूगट कार्यवाह सचिन ढोबळे, सामाजिक कार्यकर्ते निलेश नेवाळे, यश साने, सचिन सानप, प्राचार्य प्रवीण कोठावदे, सामाजिक कार्यकर्ते भीमा बोबडे, कैलास दुर्गे, शैलेश मोरे, प्रशिक्षक अरुण पाडुळे, आर्टीस्ट स्नेहा पुणेकर, निशांत बोरसे, पन्नालाल जाधव, अजय पाताडे, गोरख पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. भव्य किल्ले बनवा स्पर्धेमध्ये नागरिकांचा सहभाग वाढण्यासाठी पीसीएमसी स्मार्ट सारथी सोशल मिडिया चॅनेल्सच्या माध्यमातून प्रसार मोहीम राबविण्यात आली. या स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी ओंकार मांडगे, शुभम खनका, योगेश पाठक, आर्यन महाजन, ईशान मोटे, ओम काळे, अर्णव दीक्षित, कार्तिक चव्हाण यांनी परिश्रम घेतले.

स्पर्धेतील विजेत्यांची नावे पुढीलप्रमाणे:-

१) प्रथम क्रमांक – सुरश्री हाउसिंग सोसायटी, संभाजी नगर २) द्वितीय क्रमांक – नंदादीप सोसायटी, शिवतेज नगर ३) तृतीय क्रमांक – संत ज्ञानेश्वर विरंगुळा केंद्र, अजमेरा ४) चतुर्थ क्रमांक – सी-२१, स्वामी समर्थ बिल्डींग, घरकुल. ५) पंचम क्रमांक – आम्ही गड गोंधळी, पूर्णा नगर. ६) उत्कृष्ट सजावट आणि स्वच्छता – अजिंक्यतारा सोसायटी, गुरुदत्त मंदिर. ७) उत्कृष्ट सादरीकरण – वक्रतुंड मित्र मंडळ, पिंपळे सौदागर. ८) उत्कृष्ट सादरीकरण – श्री निवास सोसायटी, शाहू नगर. ९) उत्कृष्ट सामाजिक संदेश – तुलसी संकुल सोसायटी, पूर्णा नगर. १०) उत्कृष्ट सामाजिक संदेश – शुभंकरोति हाउसिंग सोसायटी, पूर्णानगर.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *