पिंपरी : प्रतिनिधी
अखिल मराठी पत्रकार संस्था सलग्न पिंपरी चिंचवड शहर पत्रकार संघाच्या वतीने विविध कार्यक्रम व सुट्टीच्या दिवशी पत्रकारांना एकांत वेळ मिळावा म्हणून कोकणातील दिवेआगार व हरिहरेश्वर येथे दोन दिवसाच्या दौऱ्याचे आयोजन केले होते. दिवेआगार येथे पत्रकारांनी समुद्रात पोहण्याचा आनंद घेतला तसेच येथेच गणपती मंदिरात सोन्याचा गणपती दर्शन घेऊन नंतर हरिहरेश्वर या ठिकाणी जाऊन महादेवाचे दर्शन घेतले.
मराठी पत्रकार संस्थेचे संस्थापक अध्यक्ष बापूसाहेब गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली कोकण दौऱ्याचे आयोजन केले होते. या दौऱ्याला शहरातील बहुसंख्य पत्रकार उपस्थित होते. पिंपरी चिंचवड शहर पत्रकार संघाचे आजपर्यंत सर्व कार्यक्रम यशस्वी झाले असून या पुढेही भव्य कार्यक्रम राबविणार असल्याचे संस्थापक अध्यक्ष बापूसाहेब गोरे यांनी सांगितले.
यावेळी संस्थापक अध्यक्ष बापूसाहेब गोरे, पिंपरी चिंचवड पत्रकार संघाचे अध्यक्ष दादाराव आढाव, डिजिटल मिडियाचे अध्यक्ष भीमराव तुरुकमारे, जेष्ठ पत्रकार सुनील ऊर्फ बाबू कांबळे, उपाध्यक्ष गणेश शिंदे, विनय लोंढे,
महेश मंगवडे, संतोष जराड, कलिंदर शेख, यशवंत गायकवाड, अमोल डंबाळे, प्रीतम शहा, अल्ताफ शेख, शफिक शेख, मुकेश जाधव, सुहास आढाव आदि पत्रकार उपस्थित होते.