पिंपरी : प्रतिनिधी
तळवडे, चिखलीगांव कमान ते मोशी चौक या रस्त्यावर अनेक बिल्डर कडून कामे चालू आहेत. त्यामुळे या मार्गावर मोठ्या प्रमाणात धूळ उडत आहे. या धुळी तून मार्ग काढताना वाहन चालकच नव्हे तर पायी चालणारे नागरिक सुद्धा हैराण झाले आहेत. महापालिकेने यावर लवकरात लवकर तोडगा काढावा अन्यथा महापालिकेवर राष्ट्रवादी शहराध्यक्ष अजितभाऊ गव्हाणे यांच्या नेतृत्त्वात वाहतूकदारांचा भव्य मोर्चा काढावा लागेल, असा इशारा वाहतूक सेल अध्यक्ष म्हणून वरखडे यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.
या रस्त्यावरून चालताना तोंडाला मास्क लावूनच जावे लागते. हा मार्ग तीर्थक्षेत्रांच्या मार्गावर आहे. या ठिकाणी मोई कडून पण एक रस्ता येतो, त्याच बाजूला विविध कंपन्या आहेत. आणि खडी मशीन सुद्धा आहेत. या चिखली मोशी परिसरात अनेक बिल्डर येथे बांधकाम करतात, तसेच ऐश्वर्या हमारा या प्रोजेक्ट च्या मागे लिगिसी रिव्हर साईड येथे पण नागरिक धुळीच्या त्रासाने हैराण झाले आहेत. तिथे सुद्धा विनापरवाना मशीनरी चालू आहेत. त्यामुळे या परिसरातील नागरिक त्रस्त आहेत.
वाहन चालकांना धुळीमुळे स्पष्ट दिसत नसल्यामुळे अनेक अपघात या मार्गावर होत आहेत. तसेच तळवडे चौक ते मोशी या मार्गावर खूप खड्डे पडलेले आहेत. पथदिवे बंद आहेत, त्यामुळे वाहतूक कोंडी होते. यामुळे प्रमाणात वाढ झालेली आहे, यावर लवकरात लवकर तोडगा काढावा, अन्यथा महापालिकेवर राष्ट्रवादी शहराध्यक्ष अजितभाऊ गव्हाणे यांच्या नेतृत्त्वात वाहतूकदारांचा भव्य मोर्चा काढावा लागेल असे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी वाहतूक सेल अध्यक्ष विनोद वरखडे यांनी निवेदन व प्रसिध्दीपत्रकात म्हटले आहे.
सदर निवेदन देतांना पिंपरी चिंचवड शहर (जिल्हा) वाहतूक सेल अध्यक्ष विनोद वरखडे, वाहतूक सेल कार्याध्यक्ष अकबर शेख, वाहतूक सेल उपाध्यक्ष स्वप्निल चव्हाण उपस्थित होते.