पिंपरी : राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) नेते जितेंद्र आव्हाड या विकृताने महामानव, भारतरत्न, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान केला आहे, महामानवांचा अवमान खपवून घेणार नसून, आव्हाड यांसारख्या वृत्तींना वेळीच ठेचून त्यांच्या पक्षाने आव्हाडांवर कारवाई करावी. तसेच, त्यांच्यावर ऍट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी भाजपा शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी केली आहे.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पोस्टर फाडल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात पिंपरी चिंचवड शहर भाजपा आक्रमक झाला आहे. भाजपा शहराध्यक्ष शंकर जगताप यांच्या नेतृत्वात भाजप अनुसूचित जाती मोर्चातर्फे आज सकाळी पिंपरी चौक येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करून आंदोलन करण्यात आले.
शंकर जगताप म्हणाले की, आमदार जितेंद्र आव्हाड यांनी मागील काही दिवसांपूर्वी महिला आणि महापुरुषांबददल अपशब्दांचा वापर केला होता. भगवान श्रीराम यांच्याबददल देखील अपशब्दांचा वापर केला होता. अशा वक्त्यांद्वारे समाजांमध्ये तेढ निर्माण करण्याचे काम आव्हाड यांच्याकडून सूरू आहे. त्यांच्या पक्षाकडून याबाबत कुठलीही दखल घेतली जात नसल्याने त्यांच्या पक्ष श्रेष्ठींकडून या घटनेचे समर्थन होत असल्याचे दिसून येते. महाराष्ट्रातून या घटनेचा खेद व्यक्त होत असून, याची वेळीच दखल न घेतल्यास भाजपा कार्यकर्ते जितेंद्र आव्हाड यांना रस्त्यावर फिरू देणार नाही, असेही ते म्हणाले.
प्रसंगी, प्रदेश उपाध्यक्ष अमर साबळे, अनुसुचित जाती मोर्चा अध्यक्ष भीमा बोबडे, महिला मोर्चा अध्यक्षा सुजाता पालांडे यांनी देखील मते व्यक्त करून या घटनेचा निषेध नोंदविला. दक्षिण आघाडी प्रदेश अध्यक्ष राजेश पिल्ले यांनी आव्हाड यांच्या विरोधात ऍट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करणार असल्याचे यावेळी जाहीर केले. आमदार जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात घोषणाबाजी देण्यात आली. तसेच, त्यांच्या प्रतिमेला जोडे मारून या घटचेना निषेध नोंदविण्यात आला.
सरचिटणीस संजय मंगोडेकर, वरिष्ठ उपाध्यक्ष राजू दुर्गे, शैला मोळक, माजी महापौर आर.एस.कुमार, मंडल अध्यक्ष सोमनाथ भोंडवे, निलेश अष्टेकर, अनुसुचित जाती मोर्चा प्रदेशचे मनोज तोरडमल, धनराज बिरदा, अजित कुलथे, वैशाली खाडये, शिवदास हांडे, दिपक भंडारी, संतोष रणसिंग, बाळासाहेब भुंबे, डॉ. संतोष शिंदे, नंदू कदम, सचिन उदागे, देवदत्त लांडे, रजिंद्र वायसे, नंदू भोगले, महेश बारसावी, मा. नगरसेवक माऊली थोरात, बाळासाहेब त्रिभूवन, सागर आंघोळकर, अनुराधा गोरखे, गोपाळ माळेकर, ऍड. दत्ता झुळूक, मंजू गुप्ता, प्रीती कामतीकर, अमेय देशपांडे, सीमा चव्हाण, अश्विनी कांबळे, पल्लवी पाठक, दिपाली कलापूरे, शोभा थोरात, मनोज ब्राम्हणकर, युवराज ढोरे, दत्तात्रय ढगे, समीर जवळकर, ऍड. गोरक्षनाथ झोळ, गणेश ढाकणे, प्रतिभा जवळकर, आरती सोनवणे, सीमा बोरसे यांच्यासह विविध आघाडयांचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी 20 मार्च 1927 रोजी महाड येथील च वदार तळे येथे अस्पृश्यते विरोधात सत्याग्रह आंदोलन केले होते. जातीभेद नष्ट करण्याच्या दृष्टीने बाबासाहेबांनी हे आंदोलन केले. या महामानवाचा अवमान करण्याचे पाप राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केले आहे.
बाबासाहेब हे प्रत्येक भारतीयांचे आदर्श आहेत. आदर्श महापुरुषाचा हा अवमान आम्ही कदापिही खपवून घेणार नाही. या कृत्यावरून आव्हाडांच्या मनात परमपूज्य डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल किती श्रद्धा आणि निष्ठा आहे हे दिसून येते. स्वतःला पुरोगामी म्हणायचे आणि असे कृत्य करायचे हे शोभनीय नाही. यानिमित्ताने त्यांचा खरा चेहरा समोर आला आहे. त्यांचा आम्ही जाहीर निषेध केला आहे.
शंकर जगताप- भाजप शहराध्यक्ष