तळेगाव : प्रतिनिधी
आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त पुण्याच्या टीजीएच-ऑन्को लाइफ कॅन्सर सेंटरच्या वतीने रुग्णालयाचे डॉक्टर तसेच इतर कर्मचाऱ्यांकरिता विशेष योग सत्राचे आयोजन केले होते. योग प्रशिक्षक कल्याणी मुंगी यांच्या मार्गदर्शनाखाली डॉक्टरांनी योगविद्येचे धडे गिरवले. नेहमी हातात स्टेथेस्कोप घेऊन रुग्णांची तपासणी करणारे डॉक्टर, परिचारीका आज योग करताना दिसून आले.
आपल्या रोजच्या जीवनात व्यायामाचा समावेश केल्याने काय फायदा होतो, व्यायामाने तणावाचे व्यवस्थापन कसे करता येईल, सकारात्मक उर्जा कशी मिळवाल आदी विषयांवर योग प्रशिक्षक कल्याणी यांनी मार्गदर्शन केले. या योग सत्राला डॉ अमोल मदाने, डॉ प्रद्युम्न, डॉ विश्वास कौल, डॉ संतोष साहू, डॉ ज्योती मेहता उपस्थित होते.