चिंचवड : प्रतिनिधी
पिंपरी चिंचवड शहरामध्ये माझी 24 तासापासून चालू असलेल्या मुसळधार पावसामुळे चिंचवड विधानसभा क्षेत्रामध्ये विविध ठिकाणी पाणी साचल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. काही ठिकाणी झाडे मोडुन पडल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण झाला होता. याची माहिती मिळताच माजी विरोधी पक्षनेते नाना काटे यांनी थेट घटनास्थळी जाऊन पाहणी केली.
चिंचवड विधानसभा मतदारसंघात सकाळपासून घटनास्थळी स्वतः उपस्थित राहत नाना काटे यांनी संपूर्ण चिंचवड मतदारसंघातील पावसाचा आढावा घेतला. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे कर्मचारी , अग्निशामकचे कर्मचारी यांना पाचारण करून मोडलेली झाडे बाजूला काढणे, तुंबलेले पाण्यांना वाट काढून देणे तसेच पाण्याचा योग्य निचरा करण्याच्या सुचना दिल्या.
तसेच पुढील काही तासात पावसाचा जोर कमी नाही झाला तर विधानसभा क्षेत्रातील वाकड व नदीकाठच्या गावाची अवस्था बिघडू शकते याची पूर्वकल्पना महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तसेच पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादा पवार यांना फोन द्वारे कळवून त्यासाठी आवश्यक यंत्रणा पुरवण्यात याव्यात अशी विनंती केली आहे.