बदलापूर घटनेच्या धर्तीवर शहरातील शाळांची सुरक्षा गरजेची
पिंपरी : प्रतिनिधी
पिंपरी चिंचवड शहरातील प्राथमिक, माध्यमिक शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने अत्यावश्यक असल्याने त्याच्यावर उपाययोजना म्हणून सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे अनिवार्य व सक्तीची आहे. बदलापूरमधील शाळेत अल्पवयीन मुलीवर झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या दुर्दैवी घटनेनंतर शहरातील शाळांची सुरक्षा गरजेची आहे. याबाबत पिंपरी चिंचवड महापालिकेचे आयुक्त शेखर सिंह यांना मा विरोधी पक्षनेते विठ्ठल उर्फ नाना काटे यांनी एक निवेदन दिले.
पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीतील बहुतांश प्राथमिक आणि माध्यमिक शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे नसल्याचे दिसून येत आहे. अनेक पालकांकडून याबाबत तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. जिथे कॅमेरे आहेत ते बंद पडलेल्या अवस्थेत आहे. त्यामुळे आपण अधिकाऱ्यांच्या मार्फत याबाबतची पाहणी करावी. तसेच महापालिका आणि खाजगी शाळांनाही चांगल्या दर्जाचे व अनेक काळ माहिती संचलित राहील, असे सीसीटीव्ही कॅमेरे सक्तीचे आहे. अशा सूचना देण्यात याव्यात. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने हे अत्यंत आवश्यक असून, हे सीसीटीव्ही बसवण्याबाबत हा मुद्दा लालफितीत न अडकवत ठेवता यात कोणतीही चालढकल करता कामा नये व त्वरित आदेश पारित करण्यात यावेत, अशी मागणी केली आहे.