Spread the love

शहरात सत्ता परिवर्तन गरजेचे : अजित गव्हाणे

पिंपरी चिंचवड : प्रतिनिधी

शहरातील मोशी व चिखली परिसरात असलेल्या मोठमोठ्या सोसायट्यांमध्ये सोसायटी धारकांना पाणीटंचाईच्या मोठ्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. या सोसायटी धारकांच्या अनेक समस्या आहेत. रस्ते, वीज, पाणी या अत्यावश्यक सुविधेपासून येथील सोसायटी धारक वंचित आहेत. त्यामुळे या त्रस्त असलेल्या सोसायटी धारकांनी तीव्र आंदोलन करण्याची भूमिका घेतली आहे. प्रामुख्याने या परिसरातील गंधर्व एक्सलेंजी सोसायटी व ऐश्वर्या हमारा ही सोसायटी या सोसायटीमधील रहिवाशांनी प्रसार माध्यमांकडे आपल्या अडचणी मांडल्या आहेत. प्रचंड आक्रोश या रहिवाशींनी केला आहे.

गंधर्व एक्सलेंजी सोसायटीत राहणाऱ्या सोसायटी धारकांनी आपल्या समस्या सांगताना सांगितले की, आम्हाला पुरेसे पाणी उपलब्ध होत नाही, त्यामुळे अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. तसेच वेळी अवेळी वीजपुरवठा खंडित होतो. आमच्या सोसायटीमध्ये डेंगू सारखे आजार मोठ्या प्रमाणात पसरले आहेत. डेंगूच्या आजाराने या सोसायटीमधील एक व्यक्ती मृत पावला. प्रत्येक विंग मध्ये असे अनेक आजार आपल्याला सापडतील. त्यामुळे या सर्व समस्यांना तोंड देण्यासाठी आम्हाला रस्त्यावर उतरावे लागणार आहे. प्रशासनाला आम्ही वेळोवेळी मागणी केली, परंतु प्रशासन आमच्या मागणीकडे दुर्लक्ष करत आहे. अनेक पुढारी नेते आमच्याकडे आमच्या समस्या जाणून घेण्यासाठी येतात तुमच्या समस्या आम्ही सोडू, असे आश्वासन देतात. परंतु, काही आमच्या समस्या आजपर्यंत सुटल्या नाहीत. अशा तक्रारी प्रसार माध्यमांकडे या गंधर्व एक्सलेंजी सोसायटीतील रहिवाशींनी केली आहे.

तसेच ऐश्वर्या हमारा या सोसायटीमधील रहिवाशींनी सुद्धा आपली परिस्थिती वेगळी नसल्याची दर्शविले आहे. येथेही पाणी टंचाई मोठ्या प्रमाणात आहे. येथेही वीज आणि रस्त्याची समस्या मोठी आहे. आम्ही सोसायटी मेंटेनन्स चार्जेस द्यायचा की, पाण्याच्या टँकरसाठी मोठ्या प्रमाणात खर्च करायचा असाही प्रश्न यावेळी या रहिवाशींनी उपस्थित केला आहे. या सर्व समस्यांबद्दल या भागातील राष्ट्रवादी शरचंद्र पवार पक्षाचे नेते अजित गव्हाणे यांच्याशी संवाद साधला असता, अजित गव्हाणे यांनी आपली प्रतिक्रिया देताना सांगितले की, पहिले पाच वर्ष भाजपची सत्ता होती. त्यानंतर मागील अडीच वर्षापासून मनपा प्रशासन कारभार सुरू आहे. त्यामुळे भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणात वाढला आहे आणि भ्रष्टाचार वाढल्यामुळे या सर्व समस्या सोड सोसायटी धारकांना सहन कराव्या लागत आहे. सध्या पिंपरी चिंचवड शहरात परिवर्तनाची गरज आहे आणि परिवर्तन झाल्याशिवाय या समस्या सुटणार नाही. आमची सत्ता असताना आम्ही सर्वतोपरी विकास कामे केली. सोसायटी धारकांना विविध सुविधा पुरविला, परंतु आमची सत्ता गेल्यानंतर विकास कामे थांबली व रहिवाशांना सोसायटीमधील नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागला .आगामी काळात जर सत्ता परिवर्तन झाले तर आम्ही चांगल्या प्रकारे विकास करून या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करू, असे अजित गव्हाणे यांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या. प्रामुख्याने पिंपरी चिंचवड शहर व भोसरी विधानसभा मतदारसंघात परिवर्तन परिवर्तन आवश्यक असल्याचेही अजित गव्हाणे यांनी सांगितले.

 

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *