पिंपरी । प्रतिनिधी
संघटनात्मक मोर्चेबांधणीमध्ये भोसरी विधानसभा मतदार संघात भाजपा आघाडीवर आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भोसरी विधानसभा मतदारसंघांमध्ये भाजपाने संघटनावर भर दिला आहे. त्याचाच एक भाग म्हणजे मंडल पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात येत आहेत.
दिघी-मोशी-चऱ्होली मंडल पदाधिकाऱ्यांना भोसरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेश लांडगे यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड शहरामध्ये शहराध्यक्ष शंकर जगताप यांच्या पुढाकाराने संघटनात्मक मोर्चेबांधणी करून या संघटनाच्या माध्यमातून निवडणुकांना सामोरे जाण्याचे भाजपाचे धोरण आहे.त्यानुसार बुधवारी आमदार महेश लांडगे यांच्या हस्ते दिघी-मोशी,-चऱ्होली मंडल पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले.
दिघी, मोशी, चऱ्होली मंडल अध्यक्षपदी संतोष भाऊसाहेब तापकीर, सरचिटणीसपदी रवींद्र तापकीर, सौरभ हगवणे, प्रमोद पठारे, नामदेव रढे, दीपक घन, शहा मोहम्मद रमजान खादिम, विक्रम पहिले, प्रताप भांबे यांची निवड करण्यात आली आहे. उपाध्यक्षपदी विकास आहेर, मच्छिंद्र परांडे, संदीप पंडित, मोहन मंडलिक,निरंजन जैन, जनाराम कुमावत, नवनाथ रसाळ, राकेश तापकीर, तसेच चिटणीस पदी विशाल लांजेवार, गणेश देशमुख विनायक प्रभू, नितीन आहेर, मांगीलाल चौधरी, मंगेश तापकीर यांना नियुक्तीपत्र देण्यात आले आहे.
महिला मंडल अध्यक्षपदी गायत्री तळेकर, युवा मंडल अध्यक्षपदी सुशांत पवार, महिला अध्यक्षपदी कल्पना पाटील, योगेश अकोलवार, चऱ्होली प्रभाग अध्यक्षपदी सुनील काटे यांची निवड करण्यात आली आहे.
या पद वाटप कार्यक्रमाला विस्तारक दीपक रजपूत, सरचिटणीस संजय मंगोडेकर, अजय पाताडे, शैला मोळक, भोसरी विधानसभा निवडणूक प्रमुख विकास डोळस, संयोजक विजय फुगे, दिनेश यादव, निखिल बोऱ्हाडे, वंदना आल्हाट, अजित बुर्डे, ,ज्येष्ठ नेते रामदास काळजे, दत्तातात्या तापकीर, संजय गायकवाड, सचिन तापकीर, उदय गायकवाड, डॉ. सुधाकर काळे, मंडल अध्यक्ष संतोष तापकीर आदी उपस्थित होते.
राष्ट्र प्रथम या भावनेतून भाजपा परिवाराचा प्रत्येक कार्यकर्ता काम करीत आहे. संघटनात्मक कार्यशैली हा भाजपाच्या विजयी वाटचालीचा गाभा आहे. भोसरी विधानसभा मतदारसंघांमध्ये संघटनात्मक मोर्चे बांधणीवर आम्ही भर दिला असून, विविध क्षेत्रातील व्यक्ती संघटनेचे पदाधिकारी म्हणून पक्षाशी जोडले जात आहेत. ‘‘समाजातील शेवटच्या घटकाचा विकास…’’ या विचाराने आम्ही काम करीत आहोत.
– महेश लांडगे, आमदार, भोसरी विधानसभा, भाजपा, पिंपरी-चिंचवड.