Spread the love

पिंपरी : प्रतिनिधी

पिंपरी चिंचवड शहरातील राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक मोरेश्वर भोंडवे यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात शिवबंधन बांधून प्रवेश केला. त्यामुळे पिंपरी चिंचवड शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार) पक्षाला हा मोठा धक्का बसला आहे.

गेल्या अनेक दिवसापासून शहरातील राष्ट्रवादीचे अनेक आजी-माजी नगरसेवक अजितदादांना सोडून शरद पवार यांच्या पक्षात जाणार असे बोलले जात होते‌. परंतु चिंचवड विधानसभेची जागा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना सोडण्यात आली असल्याची चर्चा शहरात सुरू होती. राष्ट्रवादीचे अनेक नगरसेवक शरद पवारांच्या भेटीसाठीही गेले होते. चिंचवड विधानसभेची जागा शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाला सुटणार आहे अशी चर्चा शहरात होताना दिसत आहे. याचवेळी शहरातील राष्ट्रवादीचे धडाडीचे नेते मोरेश्वर भोंडवे यांनी आज (दि. 18) रोजी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला.

मोरेश्वर भोंडवे यांनी शिवसेना पक्षात प्रवेश करत चिंचवड विधानसभेतील त्यांच्यासोबत अनेक कार्यकर्त्यांनी शिवबंधन बांधून शिवसेनेत प्रवेश केला.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *