
पिंपरी : प्रतिनिधी
दिल्ली विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला ऐतिहासिक महा विजय मिळाला आहे. त्यामुळे 27 वर्षानंतर दिल्लीमध्ये पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षाचे सरकार स्थापन होणार आहे. दिल्लीतील या विजयाचा भाजपा पिंपरी चिंचवड शहर (जिल्हा) च्या वतीने मोठ्या प्रमाणात जल्लोष करण्यात आला. भाजपा मध्यवर्ती कार्यालय, मोरवाडी येथे भाजपा पदाधिकाऱ्यांनी फटाके फोडून आतषबाजी करण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात दिल्लीकर जनतेने भाजपला दिलेला हा ऐतिहासिक विजय असल्याची दावा भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी केला.
यावेळी, भाजपा कार्यकारी अध्यक्ष शत्रुघ्न काटे, माजी अध्यक्ष सदाशिव खाडे, प्रदेश सदस्य मोरेश्वर शेडगे, सरचिटणीस शितल शिंदे, अजय पाताडे, संजय मंगोडेकर, वरिष्ठ उपाध्यक्ष राजू दुर्गे, मनोज तोरडमल, मंडल अध्यक्ष सोमनाथ भोंडवे, देवदत्त लांडे, कैलास सानप, रवींद्र देशपांडे, प्रीती कामतीकर, गणेश ढाकणे, दत्ता यादव, पोपट हजारे, राकेश नायर, दीपक भंडारी, नेताजी शिंदे, खंडूदेव कठारे, महेश बरसावडे, भूषण जोशी, प्रमोद ताम्हणकर यांच्यासह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी कार्यालय परिसरात फटाके फोडून, पेढे वाटून फुगड्या खेळत आनंद व्यक्त केला. तसेच, ढोल वाजवत विजयाचा आनंद व्यक्त केला. हा विजय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदर्शी नेतृत्वामुळे मिळालेला विजय असल्याचा दावा भाजपा कार्यकारी अध्यक्ष शत्रुघ्न काटे यांनी यावेळी केला.