
ध्पिंपरी : प्रतिनिधी
पिंपरीतील संत तुकारामनगर येथील डॉ. डी. वाय. पाटील डेंटल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये अग्निशामक सराव (फायर मॉक ड्रिल) चे (दि. ८) रोजी सकाळी 9.30 ते 10 च्या दरम्यान आयोजन करण्यात आले होते.
यावेळी NABH (नॅशनल अॅक्रेडिटेशन बोर्ड फॉर हॉस्पिटल्स अँड हेल्थकेअर प्रोव्हायडर्स) प्रोटोकॉलच्या अंतर्गत, या सरावा दरम्यान, सर्व कर्मचारी, विद्यार्थी आणि डॉक्टरांनी रुग्णांसह यशस्वी रित्या रुग्णालयाच्या परिसरातून सुरक्षित बाहेर पडून निर्दिष्ट संकलन बिंदू वर (असेंब्लीपॉईंट) एकत्रित होऊन सुरक्षितता सुनिश्चित केली जाते.
अशा प्रकारचे सराव प्रत्यक्ष जीवनातील आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी अत्यंतमहत्त्वाची भूमिका बजावतात. हे मॉक ड्रिल दर तिमाहीला आयोजित केले जातात. या सरावाचा उद्देश कर्मचारी, विद्यार्थी आणि रुग्णांना सुरक्षा प्रक्रियांची माहिती देणे आणि सुरक्षित वातावरण राखण्यासाठी हॉस्पिटलच्या वचन बद्धतेला बळकटी देणे हा आहे.