तीन दिवसांत दहा हजार मुलांचा उत्स्फूर्त सहभाग; बालदिनानिमित्त रंगला आनंदोत्सव
पिंपरी-चिंचवड : प्रतिनिधी
थेरगावात बालदिनाचे औचित्य साधत आयोजित करण्यात आलेली तीनदिवसीय ‘बालजत्रा – मनोरंजन नगरी’ बालकांसाठी खऱ्या अर्थाने आनंदाचा महोत्सव ठरली. पिंपरी-चिंचवड शहर युवा सेना आणि विश्वजीत बारणे यांच्या संयुक्त उपक्रमाला परिसरातील बालक, पालकांकडून अपूर्व प्रतिसाद मिळाला. तब्बल दहा हजारांहून अधिक मुलांनी या जत्रेतील विविध खेळ, राइड्स, आकर्षणांचा मनसोक्त आनंद लुटला.
१४ ते १६ नोव्हेंबरदरम्यान थेरगावातील पद्मजी पेपर मिल शेजारी ही भव्य जत्रा भरवण्यात आली. खासदार श्रीरंग बारणे यांच्या हस्ते जत्रेचे उद्घाटन झाले. यावेळी युवा सेना पश्चिम महाराष्ट्र सचिव विश्वजीत बारणे, समन्वयक बाळासाहेब वाल्हेकर, शहरप्रमुख निलेश तरस, युवासेना जिल्हाप्रमुख सागर पाचारणे, लोकसभा युवा सेना अध्यक्ष राजेंद्र तरस, युवती सेना जिल्हाप्रमुख सायली साळवी, युवती सेना शहरप्रमुख रितू कांबळे, शहर युवा सेना प्रमुख माऊली जगताप, माजी नगरसेवक निलेश बारणे, माजी नगरसेविका विमल जगताप, महिला संघटिका सरिता साने, उपजिल्हाप्रमुख दिलीप पांढारकर, नाना पारखे, शैलाताई निकम, सोशल मिडीयाच्या श्वेता कापसे ,रोहिणी नवले, संगीता कदम, नारायण लांडगे, हनुमंत माळी, धनाजी बारणे, नंदू उर्फ शरद जाधव, तानाजी बारणे, दिपक गुजर, बलभिम पवार तसेच मोठ्या संख्येने युवा सैनिक व परिसरातील लहान मुले व नागरिक हे मोठ्या संखेने उपस्थित होते.
बालजत्रेत आलेल्या लहानग्यांनी झुकझुक गाडी, पाण्याची बोट, जादूचे प्रयोग, छोटा-मोठा पाळणा, मिकी-माउस, सेल्फी पॉइंट यांसह विविध राइड्सचा भरभरून आनंद घेतला. जत्रेत मुलांचा ओसंडून वाहणारा उत्साह आणि त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद खऱ्या अर्थाने अविस्मरणीय ठरला.
पश्चिम महाराष्ट्र युवा सेनेचे प्रमुख विश्वजीत बारणे म्हणाले, “१४ नोव्हेंबर – पंडित नेहरू यांचा जन्मदिन हा बालदिन म्हणून साजरा केला जातो. या निमित्ताने मुलांना आनंद देण्यासाठी बालजत्रेचे आयोजन केले. थेरगावातील मुलांनी आणि पालकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. मुलांच्या चेहऱ्यावर दिसणारा आनंदच आमच्यासाठी सर्वात मोठे समाधान आहे.”
About The Author

