
नवी सांगवी : प्रतिनिधी
पावसाळा सुरू झाल्यापासून नवी सांगवी पोलीस चौकी पिंपळे गुरव डायनासोर गार्डन येथे भरपूर प्रमाणात पाणीसाठा होत होता. त्यामुळे पोलीस चौकीमध्ये तक्रार घेऊन येणाऱ्या नागरिकांना व पोलीस बांधवांना तो त्रास वारंवार सहन करावा लागत होता. त्यानंतर त्रस्त नागरिकांनी मेघराज लोखंडे चिंचवड विधानसभा अध्यक्ष ( राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार ) यांच्याकडे तक्रार केल्यानंतर सदर कामाची पाहणी स्व:ता मेघराज लोखंडे यांनी करत. २९ मे २०२५ रोजी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांना याबाबतची सविस्तर माहिती एका निवेदनाद्वारे दिली होती.
नवी सांगवी येथील पोलीस पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या विभागाने दुरुस्तीसाठी काम सुरू केले.
शरदचंद्र पवार पक्षाचे चिंचवड विधानसभा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष मेघराज लोखंडे यांनी कामाचा नारळ फोडून कामाला सुरुवात झाली असून त्या ठिकाणी नवीन पेविंग ब्लॉक, नवीन पाच हजार लिटर थंड पाण्याची टाकीचे कनेक्शन तसेच सिमेंट गट्टूचे इतर कामे करून देण्यात येणार आहे व या आधी देखील मेघराज लोखंडे यांनी पोलीस चौकीतील बंद असलेले बंद स्ट्रीट लॅम्प चालू करून देणे, डासोत्पत्ती होऊ शकणाऱ्या ठिकाणी अळीनाशक औषध फवारणी तसेच अस्वच्छता असलेल्या ठिकाणी साफसफाईचे काम करून घेतले आहे.
सदर काम हे एक आठवड्यात पूर्ण होईल. या आधी देखील मेघराज लोखंडे यांच्याकडून महापलिका अधिकाऱ्यांची कान उघडणी केली होती की महापालिकांच्या प्रशासनाचे पोलिस चौकीकडे दुर्लक्ष होत आहे.
या चौकीच्या दुरुस्ती कामानंतर पोलीस बांधवांना व नागरिकांना कोणत्या प्रकारचा त्रास सहन करावा लागणार नाही. हे मात्र आता खरे आहे.
यावेळी अवधूत कदम,गौरव जगताप,चैतन्य जाधव,जॉय चोपडे,आर्यन मसुरे व इतर पदाधिकारी उपस्थित होते.
About The Author

