
पिंपरी चिंचवड : प्रतिनिधी

आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकींच्या पूर्वसंध्येला शिवसेना पक्ष स्थानिक पातळीवर आपली फळी मजबूती करत आहे. महाविकास आघाडीतील पक्षांना यामुळे जास्त धोका निर्माण झाल्याचे चित्र दिसत आहे. पिंपरी चिंचवड शहरातील शरदचंद्र पवार पक्षाचे चिंचवड विधानसभा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष मेघराज लोखंडे यांनी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली व उद्योग मंत्री उदय सामंत यांचे उपस्थितीत आपल्या अनेक कार्यकर्त्यांसह शिवसेनेत प्रवेश केला.
मेघराज लोखंडे म्हणाले, शिवसेना संघटनात्मक दृष्ट्या सक्रिय असून – “365 दिवस, वर्षभर” कार्य करणाऱ्या एका पक्षाच्या प्रतिमेसोबत कार्यकर्ते आकर्षित होत आहेत. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील पक्ष वाढीसाठी मोठ्या जिद्दीने काम करणार असल्याचे लोखंडे यांनी सांगितले.
About The Author

