Spread the love

यशवंतनगर येथे 3 एमएलडी क्षमतेचा प्रकल्प; नागरिकांना शुद्ध पाण्याचा दिलासा

तळेगाव दाभाडे : प्रतिनिधी

तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या वतीने यशवंतनगर परिसरात उभारण्यात आलेल्या 3 एमएलडी (मिलियन लिटर प्रतिदिन) क्षमतेच्या अत्याधुनिक जलशुद्धीकरण केंद्राचा लोकार्पण सोहळा आज, रविवार दिनांक 5 एप्रिल 2026 रोजी सकाळी 10 वाजता पार पडणार आहे.

या महत्त्वपूर्ण प्रकल्पाचे उद्‌घाटन मावळ विधानसभेचे आमदार सुनील अण्णा शेळके आणि राज्याचे माजी राज्यमंत्री संजय उर्फ बाळाभाऊ भेगडे यांच्या हस्ते होणार आहे. या सोहळ्यामुळे तळेगावातील पाणीपुरवठा व्यवस्थेला मोठा बळकटी मिळणार असून, नागरिकांना स्वच्छ आणि शुद्ध पाणी उपलब्ध होण्यास मदत होणार आहे.

यशवंतनगर परिसरातील वाढत्या लोकसंख्येचा विचार करून हे जलशुद्धीकरण केंद्र उभारण्यात आले आहे. या प्रकल्पामुळे पाण्याच्या गुणवत्तेत सुधारणा होऊन आरोग्यदायी जीवनशैलीस हातभार लागणार आहे.

नगर परिषदेचे मुख्याधिकारी गिरीश दापकेकर यांनी सर्व पत्रकार बंधू-भगिनींना या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे. या लोकार्पण सोहळ्यामुळे शहराच्या पायाभूत सुविधांमध्ये आणखी एक महत्त्वाची भर पडणार असल्याचे मानले जात आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *