Spread the love

टाटा मोटर्ससह विविध क्षेत्रांत भरतीची संधी; रविवारी पिंपळगाव फाटा येथे भव्य मेळावा

तळेगाव दाभाडे : प्रतिनिधी

आंबेगाव तालुक्यातील तरुण-तरुणींना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी जनसेवक श्री. संजयभाऊ थोरात व सौ. प्राचीताई आकाश थोरात यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यामुळे स्थानिक युवकांना मोठ्या कंपन्यांमध्ये नोकरी मिळविण्याची सुवर्णसंधी उपलब्ध होणार आहे.

हा रोजगार मेळावा रविवारी, दि. २३ मार्च २०२५ रोजी सकाळी १०.३० ते दुपारी २.३० या वेळेत पिंपळगाव फाटा येथील विजय मंगल कार्यालयात पार पडणार आहे. या उपक्रमात टाटा मोटर्स कमर्शियल व्हेईकल्स लिमिटेड, निगडी, भोसरी रोड, पुणे येथे विविध पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.

मेळाव्यात बारावी पास, आयटीआय, बी.ए., बी.कॉम., बी.एस्सी., बी.बी.ए., बी.सी.ए., डिप्लोमा उत्तीर्ण उमेदवारांसाठी संधी उपलब्ध आहेत. तसेच NATS आणि NAPS योजनेअंतर्गत प्रशिक्षणासह नोकरीची संधी देण्यात येणार आहे. इच्छुक उमेदवारांनी आपल्या शैक्षणिक कागदपत्रांच्या प्रती, आधार कार्ड, पॅन कार्ड तसेच पासपोर्ट साइज फोटो सोबत आणावेत, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

या रोजगार मेळाव्यामुळे ग्रामीण भागातील युवकांना शहरात जाऊन नोकरी शोधण्याची गरज कमी होणार असून, त्यांच्या करिअरला योग्य दिशा मिळणार आहे. स्थानिक पातळीवर रोजगारनिर्मितीचा हा उपक्रम कौतुकास्पद ठरत आहे.

अधिक माहितीसाठी इच्छुकांनी ९९७५५६७८४७ किंवा ७९७२९८७६३५ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आयोजकांनी कळविले आहे. युवक-युवतींनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *