
भूम : प्रतिनिधी
राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची जयंती प्रत्येक शासकीय कार्यालय, शाळा, ग्रामपंचायत मध्ये साजरी करण्यासाठी राष्ट्रीय समाज भूमच्या वतीने भूम उपजिल्हा दंडाधिकारी यांना तसेच तहसीलदार भूम यांना निवेदनाद्वारे (दि.29) रोजी केली आहे.
राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची जयंती काही शाळा, शासकीय कार्यालय, ग्रामपंचायत मध्ये साजरी केली जात नसल्याचे दिसून येत आहे. राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची जयंती ३१ मे रोजी साजरी करण्यात यावी, अशी मागणी निवेदनामध्ये केली आहे. सदरील निवेदन उपविभागीय अधिकारी वैशाली पाटिल,तहसीलदार जयंतजी पाटिल, गट शिक्षण कार्यालय मध्ये सोमनाथ टकले यांना दिले आहें. यावेळी रासपचे तालुकाध्यक्ष गजानन सोलंकर, वकील मंडळ तालुका अध्यक्ष किशोर डोंबाळे, भूम शहर अध्यक्ष फिरोज पठाण, तालुका संपर्कप्रमुख बंडू लोखंडे, भागवत लोखंडे, प्रा.दयानंद कोपनर, बाबासाहेब मारकड , बबन कांबळे व राष्ट्रीय समाज पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.