
तळेगाव दाभाडे : प्रतिनिधी
सांकोसा परिवार, मावळ यांच्या वतीने श्री दत्त मंदिर, सत्यकमल कॉलनी गार्डन येथे वृक्षारोपणाचा कार्यक्रम (दि. ६) जुलै २०२५ रोजी संपन्न झाला.
या वेळी माजी उपनगराध्यक्ष गणेश काकडे, सिनियर पीआय रणजीत जाधव, सत्यशील राजे दाभाडे, प्रमिला राजे दाभाडे, हेमलता दाभाडे, संस्थेचे संस्थापक अध्यक्ष विलास लोहार, सुनील पाटील, उपाध्यक्ष भास्कर माळी, संग्राम पाटील, सेक्रेटरी विवेक दुबल,समाधान गिरी, खजिनदार महेशकुमार कोरी, को-खजिनदार जयकर जाधव, सिनियर सल्लागार सुदर्शन थिटे, प्रदीप जाधव, सल्लागार गुरूप्रसाद पाटील, कमिटी मेंबर विष्णू मगदूम, सुशांत सावंत, सरदार पाटील, प्रमोद तावटे, संदीप शिंदे, सचिन मंगल, विनोद पवार, अशोक शिंदे, समाधान चव्हाण, राहुल भोसले, महादेव जाधव, संतोष मोहिते, रघुनाथ गावडे,संदीप जाधव, दिग्विजय कावरे, विजय पाटील, प्रशांत पवार, विजय खोत, अरविंद गुरव, रावसाहेब कांबळे, रविकिरण काटकर, वैभव पाटील, धैर्यशील पाटील, संतोष दाभोले, नामदेव राणे, सागर पाटील, सतीश देसाई, घनश्याम सूर्यवंशी, सुरज बंडगर, शीतल लोहार, वर्षा डुबल, मनोरमा वसूगडे आदी उपस्थित होते.
या वेळी सकाळी श्रीगणेश पूजन केल्यानंतर महिलांचा हळदीकुंकूवाचा कार्यक्रम झाला. त्यानंतर सत्यकमल कॉलनीच्या बागेच्या आवारात पीआय रणजित जाधव, गणेश काकडे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आहे. यानंतर सर्वांना चहा आणि खिचडी,केळी वाटप करण्यात आले.
या वेळी संस्थापक अध्यक्ष विलास लोहार यांनी मनोगत व्यक्त करताना म्हटले की, सांगली, कोल्हापूर, सातारा या भागातील सामान्य लोकांचे असामान्य संघटन करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. गावापासून दूर राहत असताना सामान्य माणसाला अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. या वेळी कोणाची तरी आधाराची, मदतीची गरज भासते. अशा प्रसंगात वाटणारी हीच उणीव भरून काढण्याचा मुख्य उद्देश या समितीचा आहे. सेक्रेटरी विवेक दुबल म्हणाले की, तळागाळातील लोकांसाठी काम करण्याचा आमचा प्रयत्न असून, त्याचबरोबर समाजातील लोकांसाठी समाजपयोगी उपक्रम राबविण्याचा समितीचा मानस आहे.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करण येवले यांनी तर आभार प्रदर्शन समाधान गिरी यांनी केले.
About The Author

