Spread the love

मतदारांनी दाखवलेल्या या विश्वासाबद्दल मी सदैव त्यांचा ऋणी

चिंचवड : प्रतिनिधी

आपण गेल्या दहा वर्षात केलेली विकास कामे, नागरिकांशी सातत्याने ठेवलेला संपर्क तसेच शिवसैनिक आणि महायुतीच्या सर्व घटक पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी घेतलेली मेहनत यामुळे मतदारांनी आपल्याला सलग तिसऱ्यांदा निवडून देऊन देशातील सर्वोच्च अशा संसदेत पाठवले आहे. मतदारांनी दाखवलेल्या या विश्वासाबद्दल मी सदैव त्यांचा ऋणी राहीन. पिंपरी-चिंचवडकरांनी मोठे मताधिक्य दिल्यामुळे आपला विजय सोपा झाला.

राज्यात वेगळे वारे वाहत असतानाही मावळ लोकसभा मतदारसंघात शिवसेनेची खासदारकीची हॅटट्रिक झाली याचे सर्व श्रेय सर्वसामान्य व सूज्ञ मतदारांना जाते, असे उद्गार मावळचे खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांनी काढले. निवडणुकीत प्रचंड मेहनत घेणारे शिवसेनेचे पदाधिकारी व शिवसैनिकांचा आपल्या विजयामध्ये मोठा वाटा असल्याचे बारणे यांनी यावेळी सांगितले.

मावळ लोकसभा मतदारसंघातून विजयाची हॅटट्रिक केल्याबद्दल पिंपरी-चिंचवड शिवसेनेच्या वतीने खासदार बारणे यांचा सत्कार करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. शिवसैनिकांच्या वतीने फुलांनी सजवलेला मोठा धनुष्यबाण देऊन मोठ्या जल्लोषात बारणे यांना गौरविण्यात आले. खासदार बारणे व शिवसेनेच्या जयघोषात शिवसैनिकांनी मोठ्या जल्लोषात विजयोत्सव साजरा केला.

कार्यक्रमास शिवसेनेचे जिल्हाप्रमुख बाळासाहेब वाल्हेकर, शहर प्रमुख नीलेश तरस, महिला आघाडीच्या जिल्हा संघटक शैलाताई पाचपुते, युवा सेनेचे जिल्हाप्रमुख राजेंद्र तरस, महिला शहर संघटिका सरिता साने, माजी नगरसेवक प्रमोद कुटे, माजी नगरसेविका विमल जगताप, शिवसेना उपजिल्हाप्रमुख खंडूशेठ चिंचवडे, दिलीप पांढारकर, राजेश वाबळे युवतीसेना उपजिल्हाप्रमुख सायली साळवे, युवती सेना शहर प्रमुख रितू कांबळे, देहू शहर प्रमुख सुनील हगवणे, लोणावळा शहर प्रमुख संजय भोईर, देहूरोड शहरप्रमुख दीपक चौगुले, चिंचवड विधानसभा प्रमुख संतोष बारणे, पिंपरी विधानसभा प्रमुख निखिल येवले, युवासेना शहर संघटक निलेश हाके, युवासेना शहर प्रमुख माऊली जगताप, चिंचवड विधानसभा युवासेना प्रमुख मंदार येळवंडे, पिंपरी युवासेना प्रमुख सागर पुंडे, उपशहर प्रमुख दीपक वाल्हेकर, प्रदीप दळवी, सय्यद पटेल, सुदर्शन देसले, मनीष श्रीवास्तव, ॲड. मुकुंद ओव्हाळ, महिला चिंचवड विधानसभा सांघटिका शारदा वाघमोडे युवतीसेना चिंचवड सांघटिका श्वेता कापसे, कविता शिंदे, मंगल माने, मृणाली वाघमोडे यांच्यासह पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली तिसऱ्यांदा एनडीए सरकार केंद्रात सत्तेवर आले आहे, ही आनंदाची गोष्ट आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील राज्यातील सरकारही चांगले काम करीत आहे. मावळ मतदारसंघात सुरू असलेली तसेच प्रस्तावित विकास कामे मार्गी लावण्यासाठी यापुढेही आपण पाठपुरावा करू आणि मतदारांनी दाखवलेला विश्वास सार्थ ठरवून दाखवू, असे बारणे यांनी सांगितले.

मागील गोष्टी उगाळत बसण्याऐवजी शिवसैनिकांनी नव्या जोमाने पुन्हा कामाला लागावे. असे आवाहन बारणे यांनी केले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली विधानसभा निवडणुकीत शिवसेना नेत्रदीपक यश संपादन करून नवा इतिहास घडवेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

शिवसेनेचे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी त्यांच्या भाषणातून खासदार बारणे यांचे अभिनंदन केले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *