प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात प्रक्रिया संपन्न; चार टप्प्यांत ठरले प्रभागनिहाय आरक्षण
चिंचवड | प्रतिनिधी
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज आरक्षण सोडत प्रक्रिया अत्यंत पारदर्शक आणि शिस्तबद्ध वातावरणात पार पडली. ही सोडत चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात पार पडली. राज्य निवडणूक आयोगाने या कामासाठी पुणे विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांची प्राधिकृत अधिकारी म्हणून नियुक्ती केली होती. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि नियंत्रणाखाली संपूर्ण प्रक्रिया पूर्ण झाली.
कार्यक्रमास महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, तृप्ती सांडभोर, मुख्य अभियंता प्रमोद ओंभासे, सहायक आयुक्त मनोज लोणकर, सहायक नगररचनाकार प्रशांत शिंपी, नगरसचिव मुकेश कोळप, सह शहर अभियंता अनिल भालसाकळे, बापू गायकवाड, मुख्य माहिती व तंत्रज्ञान अधिकारी विजय बोरुडे, निवडणूक विभाग उपायुक्त सचिन पवार, विशेष अधिकारी किरण गायकवाड, मुख्य सुरक्षा अधिकारी उदय जरांडे, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.
उपायुक्त सचिन पवार यांनी कार्यक्रमाच्या सुरुवातीला राज्य निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार आरक्षण सोडतीची नियमावली स्पष्ट केली. त्यानंतर ही सोडत प्रक्रिया चार टप्प्यांत पार पडली.
पहिला टप्पा: अनुसूचित जाती (महिला) प्रवर्गातील जागांसाठी शाळकरी विद्यार्थ्यांच्या हस्ते सोडत काढण्यात आली. दुसरा टप्पा: अनुसूचित जमाती (महिला) प्रवर्गातील आरक्षण निश्चित करण्यात आले. तिसरा टप्पा: मागासवर्ग प्रवर्गाच्या आरक्षण सोडतीची प्रक्रिया पार पडली. चौथा टप्पा: सर्वसाधारण महिलांच्या जागांची सोडत घेऊन अखेर प्रभागनिहाय आरक्षित जागांची घोषणा करण्यात आली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपायुक्त सचिन पवार यांनी केले, तर सुरेख सूत्रसंचालनाची जबाबदारी उपायुक्त अण्णा बोदडे यांनी पार पाडली. संपूर्ण प्रक्रिया शांत, पारदर्शक आणि लोकशाही मूल्यांचे पालन करत संपन्न झाली.
प्रभाग निहाय आरक्षण पुढीलप्रमाणे-
प्रभाग क्रमांक: १
अ) ओबीसी
ब) महिला सर्वसाधारण
क) महिला सर्वसाधारण
ड) अ राखीव
प्रभाग क्रमांक: २
अ) ओबीसी महिला
ब) महिला सर्वसाधारण
क) सर्वसाधारण
ड) सर्वसाधारण
प्रभाग क्रमांक : ३
अ) महिला अनुसुचित जाती
ब) ओबीसी
क) महिला सर्वसाधारण
ड) सर्वसाधारण
प्रभाग क्रमांक : ४
अ) महिला अनुसुचित जाती
ब) अनुसुचित जमाती
क) महिला ओबीसी
ड) सर्वसाधारण
प्रभाग क्रमांक : ५
अ) महिला ओबीसी
ब) ओबीसी
क) महिला सर्वसाधारण
ड) अ राखीव
प्रभाग क्रमांक : ६
अ) महिला ओबीसी
ब) ओबीसी
क) महिला सर्वसाधारण
ड) अ राखीव
प्रभाग क्रमांक: ७
अ) ओबीसी
ब) महिला सर्वसाधारण
क) महिला सर्वसाधारण
ड) अ राखीव
प्रभाग क्रमांक : ८
अ) अनुसुचित जाती
ब) महिला ओबीसी
क) महिला सर्वसाधारण
ड) अ राखीव
प्रभाग क्रमांक: ९
अ) अनुसुचित जाती
ब) महिला ओबीसी
क) महिला सर्वसाधारण
ड) अ राखीव
प्रभाग क्रमांक: १०
अ) महिला अनुसुचित जाती
ब) महिला ओबीसी
क) अ राखीव
ड) अ राखीव
प्रभाग क्रमांक : ११
अ) अनुसुचित जाती
ब) महिला ओबीसी
क) महिला सर्वसाधारण
ड) अ राखीव
प्रभाग क्रमांक: १२
अ) ओबीसी
ब) महिला सर्वसाधारण
क) महिला सर्वसाधारण
ड) अ राखीव
प्रभाग क्रमांक: १३
अ) अनुसुचित जाती
ब) महिला ओबीसी
क) महिला सर्वसाधारण
ड) अ राखीव
प्रभाग क्रमांक: १४
अ) ओबीसी
ब) महिला सर्वसाधारण
क) महिला सर्वसाधारण
ड) अ राखीव
प्रभाग क्रमांक: १५
अ) ओबीसी
ब) महिला सर्वसाधारण
क) महिला सर्वसाधारण
ड) अ राखीव
प्रभाग क्रमांक: १६
अ) अनुसुचित जाती
ब) महिला ओबीसी
क) महिला सर्वसाधारण
ड) अ राखीव
प्रभाग क्रमांक: १७
अ) महिला अनुसुचित जाती
ब) ओबीसी
क) महिला सर्वसाधारण
ड) अ राखीव
प्रभाग क्रमांक: १८
अ) महिला ओबीसी
ब) महिला सर्वसाधारण
क) सर्वसाधारण
ड) सर्वसाधारण
प्रभाग क्रमांक: १९
अ) महिला अनुसुचित जाती
ब) महिला ओबीसी
क) अ राखीव
ड) अ राखीव
प्रभाग क्रमांक: २०
अ) अनुसुचित जाती
ब) महिला ओबीसी
क) महिला सर्वसाधारण
ड) अ राखीव
प्रभाग क्रमांक: २१
अ) महिला अनुसुचित जाती
ब) ओबीसी
क) महिला सर्वसाधारण
ड) अ राखीव
प्रभाग क्रमांक : २२
अ) महिला ओबीसी
ब) महिला सर्वसाधारण
क) अ राखीव
ड) अ राखीव
प्रभाग क्रमांक : २३
अ) महिला अनुसुचित जाती
ब) ओबीसी
क) महिला सर्वसाधारण
ड) अ राखीव
प्रभाग क्रमांक : २४
अ) ओबीसी
ब) महिला सर्वसाधारण
क) महिला सर्वसाधारण
ड) अ राखीव
प्रभाग क्रमांक : २५
अ) अनुसुचित जाती
ब) महिला ओबीसी
क) महिला सर्वसाधारण
ड) अ राखीव
प्रभाग क्रमांक : २६
अ) अनुसुचित जाती
ब) महिला ओबीसी
क) महिला सर्वसाधारण
ड) अ राखीव
प्रभाग क्रमांक : २७
अ) अनुसुचित जाती
ब) महिला ओबीसी
क) महिला सर्वसाधारण
ड) अ राखीव
प्रभाग क्रमांक : २८
अ) ओबीसी
ब) महिला सर्वसाधारण
क) महिला सर्वसाधारण
ड) अ राखीव
प्रभाग क्रमांक : २९
अ) महिला अनुसुचित जाती
ब) महिला अनुसुचित जमाती
क) ओबीसी
ड) अ राखीव
प्रभाग क्रमांक : ३०
अ) अनुसुचित जाती
ब) महिला अनुसुचित जाती
क) ओबीसी
ड) महिला सर्वसाधारण
प्रभाग क्रमांक : ३१
अ) महिला अनुसुचित जाती
ब) ओबीसी
क) महिला सर्वसाधारण
ड) अ राखीव
प्रभाग क्रमांक : ३२
अ) महिला अनुसुचित जाती
ब) ओबीसी
क) महिला सर्वसाधारण
ड) अ राखीव
About The Author

