Spread the love

श्रीगोंदा: प्रतिनिधी

खरातवाडी ग्रामस्थांच्या वतीने खासदार निलेश लंके यांना प.पु. “संत तुळशीदास महाराज” यशवंत सन्मान पुरस्कार देऊन, तसेच ज्ञानदेव लंके गुरजी व त्यांच्या पत्नी शकुंतला लंके यांना प.पु.” संत तुळशीदास महाराज” कृतज्ञता सन्मान देऊन गौरविण्यात आले. मानपत्राचे वाचन महेश यादव यांनी केले. यावेळी शाल, श्रीफळ, फेटा, मानपत्र, स्मृतिचिन्ह देण्यात आले

अ.नगर दक्षिण या लोकसभा मतदारसंघातून ऐतिहासिक विजय मिळवल्याबद्दल खासदार श्री निलेश लंके तसेच ज्ञानदेव लंके गुरुजी व त्यांच्या धर्मपत्नी शकुंतला लंके यांनी सन १९७० पासून सन१९८४ अशी १४ वर्षे शिक्षक म्हणून खरातवाडी छोट्याशा गावात शैक्षणिक कार्य करून या गावातील पिढ्या घडवण्याची उत्तुंग काम केल्याबद्दल बद्दल हा खरातवाडी गावात हा नागरी भव्य सत्कार सोहळा संपन्न झाला.

या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान बाबासाहेब भोस यांनी भूषवले तर या कार्यक्रमात प्रमुख उपस्थिती मा.आमदार राहुल दादा जगताप, घनश्याम शेलार, शकुंतला लंके, अक्षदा लंके,वंदना गंधाक्ते, सतिश गंधाक्ते, संतोष गावडे,सचिन पठारे, टिळक भोस, स्मितल भैया वाबळे,माऊली हिरवे, उत्तम डाके, राजेंद्र चेडे, सुभाषराव काळाणे,संदिप तरटे, राजेंद्र शेरकर,सुदाम पवार , संदीप तरटे, सूर्यजित पवार आदि उपस्थित होते.

यावेळी पिंपरी चिंचवडचे मा. नगरसेवक मारुती भापकर यांनी आपल्या भाषणात खरातवाडीतील हंगा नदी व पळसनाला येथील तात्पुरते पूल पावसामुळे वाहून जातात त्यामुळे येथील शेतकरी, विद्यार्थी, जनावरे यांना जीव मुठीत धरून नदी पार करावी लागते. त्यामुळे या नदीवरील पक्के पुल व्हावेत, तसेच घारगाव खरातवाडी एरंडोली व इतर रस्त्यांची कामे वर्षानुवर्ष झालेली नाहीत. ती कामे तातडीने व्हावेत. तसेच खरातवाडीची स्वतंत्र ग्रामपंचायत व्हावी आदि मागण्या केल्या केल्या.

 

पुढे भापकर यांनी सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी पुणे जिल्ह्यातील ६६ बंधारे कुकडी प्रकल्प मध्ये समाविष्ट करावे. डिंबे- माणिकडोह बोगदा रद्द करावा अशी मागणी केली असून वळसे पाटील यासाठी प्रयत्नशील आहेत. जलसंपदा मंत्र्यांच्या समवेत वळसे पाटील यांनी लावलेल्या तीन बैठका रद्द करण्यास आम्ही भाग मात्र वळसे पाटील यांचा या मागण्यासाठी आग्रह कायम आहे. तसा त्यांचा प्रयत्न सुरू आहे.त्यांच्या या मागण्या पूर्ण झाल्या तर श्रीगोंदा पारनेर कर्जत जामखेड करमाळा या तालुक्यांचा वाळवंट होईल हा निर्णय झाला तर या तालुक्यातल्या शेतकऱ्यांसाठी मृत्यूचे फर्मान ठरेल. त्यामुळे तालुक्यातील सर्वपक्षीय नेत्यांनी स्वार्थी, कुरघोडीचे, श्रेयवादाचे राजकारण सोडून पक्ष अभिनिवेष बाजूला सारून शेतकरी म्हणून एकत्रित येऊन संघर्ष करण्याची आवश्यकता असून यासाठी खासदार निलेश लंके यांनी पुढाकार घ्यावा आम्ही तालुक्यातील सर्व शेतकरी त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहू. असे भापकर यांनी सांगितले.

यावर खासदार निलेश लंके यांनी या विषयासंदर्भात यापुढे कुकडीच्या पाण्याबाबत पुणेकरांची दादागिरी खपवून घेतली जाणार नाही. मी या विषयाबात पत्रव्यवहार केले असून पुढच्या काळात श्रीगोंदा, पारनेर,कर्जत, जामखेड, करमाळा शेतकरयां वर होणारा अन्याय सहन केला जाणार नाही. झाला तर मी वेळप्रसंगी शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी रस्त्यावर उतरेल. तसेच माझी जन्मभूमी खरातवाडीतील ग्रामस्थांच्या सर्व समस्यांचे निराकरण करण्याचे मी अभिवचन देत आहे.

मा. आमदार राहुल जगताप यांनी खासदार निलेश लंके यांना खरातवाडी पिंपळगाव पंचक्रोशीतील मतदारांनी प्रचंड मताधिक्य देऊन विजय केले आहे. त्याची परतफेड म्हणून पारनेर तालुक्यापेक्षाही पुढे जाऊन श्रीगोंदा तालुक्याच्या विकासासाठी लंके हे कटिबद्ध राहतील अशी शेतकरी वर्गाची अपेक्षा आहे.

घनश्याम आण्णा शेलार यांनी कुकडीच्या ज्वलंत मुद्द्यावर शेतकऱ्यांनी एकत्रित झाले पाहिजे. जर मारुती भापकर यांच्या कोर्टाचा निर्णय झालेला नसता तर सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील व आमदार अतुल बेनके यांच्या मागणीप्रमाणे ६६ बंधाऱ्यांचा समावेश कुकडी प्रकल्पात करून डिंबे माणिकडोह बोगदा रद्द झाला असता. या प्रश्नावर या पुढच्या काळात खासदारांनी नेतृत्व करून भूमिका घ्यावी आम्ही सर्व शेतकरी त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहु.

कार्यक्रमाचे अध्यक्ष बाबासाहेब भोस यांनी तालुक्यात आगामी विधानसभा निवडणुकांसाठी महाविकास आघाडी कडून अनेक उमेदवार इच्छुक आहेत. महाविकास आघाडीच्या इच्छुक उमेदवारांपैकी दोन किंवा तीन उमेदवार उभे राहिले तर महायुतीच्या उमेदवाराला त्याचा लाभ होऊ शकतो. त्यामुळे महाविकास आघाडी देईल त्या उमेदवारासाठी सगळ्यांनी एकत्रित येऊन झटून काम केले तर महाविकास आघाडी या तालुक्यात विजय होईल. यासाठी सर्व इच्छुक उमेदवारांची एकी महत्त्वाची आहे. जर तुमची एकी होत नसेल तर या वयात माझा विचार व्हावा. अशी ही अपेक्षा व्यक्त केली. खासदार लंके यांनी श्रीगोंदा तालुक्याच्या विकासासाठी राहिलेला बॅकलॉक भरून काढण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करावेत तालुक्यातील सर्व नेते व शेतकरी त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहतील.

या कार्यक्रमात एकाच परिवारातील तिन मुली व एक मुलगा पोलीस खात्यात भरती झाल्याबद्दल सोनाली मोटे, रुपाली मोटे, रोहिणी मोटे, ज्ञानेश्वर मोटे, तसेच प्रवीण शेंडगे यांची शिक्षक विभागात निवड झाल्याबद्दल खासदार निलेश लंके व मा.आ. राहुल जगताप यांच्या हस्ते शाल श्रीफळ, स्मृतिचिन्ह देवुन गौरवण्यात आले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला खासदार निलेश लंके खरातवाडी गावात भव्य मिरवणूक काढण्यात आली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मधुकर सुपेकर यांनी केले तर बापूराव देवकाते यांनी आभार मानले.

हा कार्यक्रमासाठी सुरेश भापकर, लक्ष्मण इथापे, मारुती भापकर, राहुल शेंडगे,महेश यादव, सचिन भापकर,सुजित इथापे, ज्ञानदेव भापकर, कृष्णा यादव, दत्तात्रय भापकर, तात्या इथापे, मधुकर सुपेकर, बंडू सलगर, किसन बाबुराव इथापे, बापूराव देवकाते, नितिन भापकर, शहाजी शेंडगे, आप्पा बाबुराव इथापे, संजय फराटे, गणेश इथापे, चंद्रकांत भापकर,संजय चौगुले, नाना इथापे,सुरेश चौगुले, राजेंद्र भापकर, डॉ सचिन जगताप, चंद्रकांत भापकर, सुधीर भापकर, तुषार इथापे, शरद इथापे, शहाजी भापकर, अतुल पुराणे,श्याम बारगुजे आदि कार्यकत्यांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी परिश्रम घेतले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *