ग्रामस्वराज फाऊंडेशन वाल्हा यांचा अनोखा उपक्रम
भूम : प्रतिनिधी
ग्रामस्वराज फाऊंडेशनच्या तिसऱ्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून स्पर्धेच्या या युगात टिकून राहण्यासाठी मुलांना लहान वयातच स्पर्धा परीक्षेची माहिती व्हावी व स्पर्धा परीक्षेबद्दल विद्यार्थ्यांच्या मनात असणारी भीती दूर व्हावी यासाठी शिवजयंतीनिमित्त छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चरित्रावर 100 गुणांच्या परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी ग्रामस्वराज फाऊंडेशन वाल्हा यांचे पदाधिकारी तसेच शालेय व्यवस्थापन सर्व पदाधिकारी, ग्रामपंचायत सदस्य, शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक व गावकरी मोठ्या संख्येने उपस्तिथ होते.
ग्रामस्वराज फाऊंडेशन वाल्हा ता. भुम, जि. धाराशिव यांनी ही परीक्षा दि. १७ फेब्रुवारी २०२४ रोजी जिल्हा परिषद शाळा वाल्हा व जिल्हा परिषद शाळा येमाई वस्ती या दोन शाळेत घेण्यात आली. या परीक्षेत प्रत्येक वर्गातून सर्वाधिक गुण मिळवणाऱ्या मुलांमधून प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक काढून त्या विद्यार्थ्यांना ग्रामस्वराज फाउंडेशन मार्फत ट्रॉफी व शालेय साहित्य बक्षीस देण्यात आले.
या सामान्यज्ञान परीक्षेत सहभाग घेणाऱ्या प्रत्येक स्पर्धकांना पेन देण्यात आले. हा बक्षीस वितरणाचा कार्यक्रम शिवजयंतीनिमित्त दिनांक १९ फेब्रुवारी २०२४ रोजी जिल्हा परिषद शालेच्या प्रांगणात पार पडला.