
मावळचे कृषी अधिकारी यांना निवेदन
तळेगाव दाभाडे : प्रतिनिधी
मावळ तालुक्यातील भात व इतर पिकांचा पीक विमा काढण्यात यावा, अशी मागणीचे निवेदन शिवसेनेचे तालुकाप्रमुख राजेश खांडभोर यांनी मावळचे कृषी अधिकारी यांना दिले आहे.
निवेदनात म्हटले आहे की, मावळ तालुका हा भात लागवडीसाठी प्रसिध्द आहे. यंदा पाऊस लवकर सुरू झाल्याने भात लागवडीची रोपे कमी प्रमाणात उगवली आहे. तरी गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा किती भात पिकांचे व इतर पिकांचे नुकसान किती प्रमाणात झाले व किती हेक्टरवर भात लागवड होणार आहे याची आकडेवारी प्रसिध्द करावी. तसेच प्रधानमंत्री पीक विमा किती शेतकऱ्यांनी काढल आहे किंवा पी डी सी सी बेॅंक मार्फत शेतकरी पीक कर्ज घेतात तेव्हा त्यांचा पीक विमा किती, शेतकरी यांचा स्थानिक सोसायटीच्या मार्फत बँकेनी उतरवला आहे अशी आकडेवाडी जाहीर करून, ज्या शेतकऱ्यांचे याबाबत नुकसान झाले आहे व त्याच्याकडे पीक विमा आहे त्यांना नुकसान भरपाईपासून वंचित ठेवू नये. याबाबतीत योग्य ती उचित कारवाई लवकरात लवकर करावी. या वेळी मंगेश हुलावळे, शरद हुलावळे, सोमनाथ कोंडे, राजेश वाघोले आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
About The Author
