
वंचित बहुजन आघाडी मावळ तालुका यांच्या वतीने तहसीलदारांना निवेदन
तळेगाव दाभाडे : प्रतिनिधी
वंचित बहुजन आघाडी मावळ तालुका यांच्या वतीने (दि.1) जुलै २०२५ रोजी वडगाव मावळ तहसील या ठिकाणी मावळ तालुक्यामध्ये ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्यता मिळावे याबाबत तहसीलदार निवेदन देण्यात आले.
मावळ तालुका कृषीप्रधान आहे या तालुक्यात प्रामुख्याने भाताचे पीक घेतलं जाते. मावळ तालुका इंद्रायणी तांदळासाठी सुप्रसिद्ध आहे. परंतु शेतीची पूर्व मशागत करण्यापूर्वीच पावसाने संततधार चालू केल्यामुळे काही शेतकऱ्यांना पेरणी करता आली नाही आणि ज्यांची पेरणी झाली त्यांची रोपे अति पावसाने वाहून गेली. यामुळे मावळ तालुक्यातील शेतकरी हवालदिल झाला आहे. यामुळे वंचित बहुजन आघाडीने तहसीलदारांमार्फत शासनाकडे निवेदन सुपूर्द केले आहे की, मावळ तालुक्यात पंचनामा करून ओला दुष्काळ जाहीर करावा आणि तेथील शेतकऱ्यांना दिलासा म्हणून आर्थिक सहाय्य द्यावे, अशी भूमिका घेतली आहे.
तसेच वडगाव पंचायत समिती जिल्हा परिषद या ठिकाणी अनेक योजना राबवल्या जातात पण त्या खेड्यापाड्यातील गरीब गरजू लोकांपर्यंत पोहोचत नाही. त्यामुळे या योजना खेड्यातील प्रत्येक गरजू पर्यंत कशाप्रकारे पोहोचवता येईल यासाठी तेथील प्रमुख अधिकाऱ्यांनी नियोजन करावे. शालेय शिक्षणाचे वर्ष चालू झाले आहे. शाळेतील कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी विद्यार्थ्यांना बरीच कसरत करावी लागते जातीचे दाखले असतील उत्पन्नाचे दाखले असतील यासाठी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाऊ नये, वेळ वाया जाऊ नये यासाठी त्यांना त्वरित दाखले मिळावेत.
यावेळी संतोष भाऊ लोखंडे- पू.जि.उपाध्यक्ष वंचित बहुजन आघाडी, राजूभाऊ गायकवाड- पू.जि.संघटक वंचित बहुजन आघाडी, नितीन भाऊ ओव्हाळ -अध्यक्ष- वंचित बहुजन आघाडी मावळ तालुका, संदीप भाऊ कदम -अध्यक्ष वंचित बहुजन युवा आघाडी मावळ तालुका, मनीषाताई ओव्हाळ -अध्यक्ष वंचित बहुजन महिला आघाडी मावळ तालुका, दत्ताभाऊ शिंदे -समता सैनिक दल मेजर, अनिल नाना गायकवाड- अध्यक्ष भारतीय बौद्ध महासभा मावळ तालुका, संजय भाऊ कुलकर्णी- अध्यक्ष माथाडी कामगार युनियन मावळ तालुका, किसन नाना गायकवाड- जेष्ठ कार्यकर्ते, गौतम ओव्हाळ- ज्येष्ठ कार्यकर्ते, बाळकृष्ण टपाले- जेष्ठ कार्यकर्ते, लहू लोखंडे मावळ- तालुका सचिव, सुनील वाघमारे- मावळ तालुका उपाध्यक्ष, अक्षय साळवे-महासचिव युवा आघाडी, बब्रुवन कांबळे – सचिव युवा आघाडी, पवन उदागे – वडगाव शहर उपाध्यक्ष, प्रमोद खंडारे- युवा अध्यक्ष वडगावं शहर, दिनेश गवई – तळेगाव शहर अध्यक्ष, ज्योतीताई गायकवाड सोमाटणे, आश्लेषा गायकवाड सोमाटणे आदी उपस्थित होते.
About The Author

