
तळेगाव दाभाडे : प्रतिनिधी
रुग्णसेवेत अहोरात्र कार्य करणाऱ्या डॉक्टरांचे योगदान स्मरणात ठेवत, त्यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी १ जुलै रोजी राष्ट्रीय डॉक्टर दिन साजरा केला जातो. यानिमत्ताने टिजीएच ऑन्को लाइफ कॅन्सर सेंटरमध्ये डॅाक्टरांना गुलाबपुष्प तसेच भेटकार्ड देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले.
उपस्थित डॅाक्टरांसाठी याठिकाणी म्युझिक थेरपी सत्र, मनोरंजनात्मक खेळ आणि कराओके सादरीकरणाचे आयोजन करण्यात आले असून डॅाक्टरांनी या कार्यक्रमाचा मनमुराद आनंद लूटला.
About The Author
