
तळेगाव दाभाडे : प्रतिनिधी
माजी आमदार, मावळ भूषण कृष्णराव धोंडीबा भेगडे( वय ८९ वर्ष) यांचे वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले. मावळ तालुक्याच्या राजकीय. सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य अशा अनेक क्षेत्रावर त्यांचा मोठा प्रभाव होता. भारतीय जनसंघ या राजकीय पक्षातून त्यांनी आपल्या राजकीय कारकिर्तीची सुरुवात केली. दोन वेळा ते मावळ मतदार संघातून विधानसभेवर निवडून गेले होते. त्यांच्या पश्चात कन्या, जावई, दोन बहिणी, पुतणे, भाचे, नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्या निधनाने शिक्षण आणि राजकीय क्षेत्रातील मोठे नेतृत्वं हरपलं असल्याची भावना व्यक्त होत आहे.
About The Author
