
पिंपरी चिंचवड : प्रतिनिधी
पिंपरी चिंचवड महानगरपालिका दरवर्षी पावसाळ्यापूर्वी शहरातील स्ट्रॉम वॉटर, ड्रेनेज लाइन, नाले सफाई केली जाते. परंतु यावर्षी तसे केल्याचे दिसत नाही कारण सध्या अवकाळी पाऊस पडत आहे व या अवकाळी पावसामुळे संपूर्ण शहरातील सर्व स्ट्रॉम वॉटर, ड्रेनेज लाइन, नाले यातील कचरा साफ न केल्याने स्ट्रॉम वॉटर, ड्रेनेज लाइन तुडुंब भरून जागो जागी रस्त्यावर पावसाचे पाणी साचत असून नगरिकाना वाहने चालवताना, रस्त्याने चालताना अडचणीना सामोरे जावे लागत आहे तसेच या साचलेल्या पाण्याने घणीचे साम्राज्य पसरत असून नगरिकाना आरोग्याच्या समस्येला देखील सामोरे जावे लागत आहे, अशी माहिती मा. विरोधी पक्षनेते नाना काटे यांनी पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त शेखर सिंह यांची भेट घेऊन निवेदन देऊन माहिती दिली.
पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त शेखर सिंह यांनी याकडे लक्ष न दिल्यास ही बाब गंभीर होऊ शकते. मोठा पाऊस पडल्यास शहराची अवस्था जलमय होईल व संपूर्ण शहराला मोठया संकटाला सामोरे जावे लागेल, अशी माहिती नाना काटे यांनी दिली.
आयुक्त शेखर सिंह यांनी पावसाळ्यापूर्वी शहरातील स्ट्रॉम वॉटर, ड्रेनेज लाइन, नाले सफाई करण्याचे त्वरित आदेश संबंधित विभागाला देण्यात यावे, अशी काटे यांनी मागणी केली आहे.
About The Author

