पुणे : प्रतिनिधी
जिल्हा कोषागार कार्यालय पुणे येथून मासिक निवृत्तीवेतन घेणाऱ्या राज्य शासकीय निवृतीवेतनधारक, कुटुंब निवृतीवेतनधारकांचे निवृत्तीवेतन बँकेमार्फत जमा होत असते. तथापी, एप्रिल २०२४ पासूनचे निवृत्तीवेतन हे ई-कुबेर प्रणालीमार्फत भारतीय रिझर्व्ह बँकेतून थेट निवृत्तवेतनधारकांच्या बँक खात्यात जमा होणार असल्याची माहिती वरिष्ठ कोषागार कार्यालय, पुणे यांनी दिली आहे.
निवृत्तीवेतनधारकांनी पुणे कोषागार कार्यालयातील निवृत्तीवेतन विभागाला सूचीत न करता बँक शाखा किंवा खाते क्रमांक परस्पर बदलला असल्यास त्यांचे निवृत्तीवेतन जमा होणार नाही. अशा निवृत्ती वेतनधारकांनी मूळ बँकेचे ना हरकत प्रमाणपत्र आणि नवीन बँक खात्याच्या पासबुकच्या प्रतिसह जिल्हा कोषागार कार्यालयातील निवृत्तीवेतन विभागाला १९ एप्रिलपर्यंत माहिती द्यावी. अन्यथा एप्रिल महिन्याचे निवृत्तीवेतन जमा होण्यास अडचण निर्माण होऊ शकते, असेही कळविण्यात आले आहे.
0000